Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
Home » आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट – राज्य शासनाक़डून विविध कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
पिंपरी चिंचवड

आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट – राज्य शासनाक़डून विविध कामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या गावांसाठी अधिकचा निधी

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comOctober 28, 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 || प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाकडून राबविलेल्या जाणा-या विविध योजनांमधून सुमारे १२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मतदारसंघातील नागरिकांच्या सेवा-सुविधांशी निगडीत कामे होणार आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने एकप्रकारे हे चिंचवड विधानसभेत दिवाळी गिफ्ट मिळाले असून हा शासन निधी पिंपरी-चिंचवड शहरासोबतच विशेषतः वाकड, पुनावळे,मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने वाढणाऱ्या भागाला अधिकचा निधी देऊन तेथील विकासाला हातभार लागला आहे.

राज्यातील महायुती सरकार विकासाचे उदिष्ट साध्य करणारे व जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शंकर जगताप यांच्याकडून सातत्याने शासनाच्या माध्यमातून विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून दिवाळी सणाच्या पुर्वसंध्येला शासनाकडून चिंचवड विधानसभेतील अनेक कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला.

महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गंत चार महत्वकांक्षी कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये रावेत येथे सुसज्ज बहुउद्देशीय इमारत बांधणे, मामुर्डी येथील मनपाच्या जागेत क्रीडासंकुल उभारणे, वाकड वेणूनगर येथे क्रीडा संकुल उभारणे, किवळे येथीलजागेत राष्ट्रीय दर्जाचे भारतरत्न उद्यान विस्तारीकरण करणे या मोठ्य़ा कामांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये वाकडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सभागृह बांधणे, क्रीडासंकुल उभारणे. जलतरण तलाव बांधणे, टेनिस कोर्ट तयार करणे, तसेच पुनावळेमध्ये सभागृह, वाचनालय, विरंगुळा केंद्र बांधणे आणि सांगवी परिसरात विविध सुशोभिकरणाच्या कामांचा समावेश आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गंत १४ कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी २० लाख रुपयांचा निधी या कामांसाठी उपलब्ध देखील करून देण्यात आलेला आहे. या अंतर्गंत किवळे एमबी कॅम्प झोपडपट्टीत पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन टाकणे, वाचनालय उभारणे, काँक्रिटीकरण करणे, सभा मंडप बांधणे, तसेच नागसेन नगर झोपडपट्टी येथे वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करणे, नवीन स्वच्छतागृह उभारणे, पिंपळे गुरव लक्ष्मीनगर येथे बुद्धविहाराचे सीमाभित व विहारात अभ्यासिका तयार करणे, वेताळनगर झोपडपट्टी बौद्ध विहार परिसरात विविध कामे करणे, थेरगाव जगतापनगर येथील दलितवस्ती परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे आणि राजीव गांधीनगर पिंपळे गुरव झोपडपट्टीत ड्रेनेज लाईन टाकणे या कामांचा समावेश आहे.

“वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांची गरज प्रचंड वाढली आहे. शासनाकडून मंजूर झालेला हा १२ कोटींचा निधी म्हणजे विकसित आणि स्मार्ट चिंचवड मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विशेषतः वाकड, पुनावळे, रावेत, मामुर्डी आणि किवळे या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागातील नागरिकांना या कामांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ होईल. खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसाठी निर्माण होणारी नवीन केंद्रे ही आरोग्यदायी, सशक्त आणि विकसित चिंचवडच्या’ निर्मितीकडे एक ठोस पाऊल आहे. शासन निधीचा योग्य वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत विकास पोहोचवणे, हेच आमचे ध्येय आहे.”
— शंकर जगताप
आमदार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपत्नीकडून पतीचा गळा आवळून खून; चिंचवडमध्ये खळबळ – सामाजिक कार्यकर्त्याचा दुर्दैवी अंत
Next Article चिंचवड खून प्रकरणात नवा खुलासा : पत्नीच्या प्रियकरालाही अटक
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

July 26, 2026

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

साने चौकात कोयता गँगचा धुमाकूळ; तरुणावर जीवघेणा हल्ला, परिसरात दहशत.

June 22, 2026

कार रस्त्यात थांबवल्याच्या कारणावरून पोलीस भरती प्रशिक्षकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा.

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
पिंपरी चिंचवड

श्री गुरु गणेश बालक मंदिर चिंचवड व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे उत्साहात पालखी सोहळा संपन्न.

By shauryavartanews2025@gmail.comJuly 26, 20260

चिंचवड : आषाढी एकादशीचे औचित्य साधत श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री गुरु गणेश…

स्व. शंकरलालजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्री फत्तेचंद विद्यालयात स्काऊट पथकाकडून मानवंदना.
विविध शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

July 22, 2026

नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाचा उद्या निकाल.
अवघ्या पावणेदोन महिन्यांत सुनावणी पूर्ण; राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात वेगवान खटल्याकडे लक्ष

June 24, 2026

लोहगडवर भावी पतीचा खून; होणाऱ्या पत्नीसह प्रियकराला अटक
अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून कट रचून दरीत ढकलल्याचा आरोप

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?