- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: shauryavartanews2025@gmail.com
📍 पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : ( अमोल बेडके ) पोलिस दलावर नागरिकांचा विश्वास असतो, मात्र पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रावेत पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी हा विश्वास तुडवून लाजीरवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका गुन्ह्याच्या तपासात आरोपीस मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या महिला पोलीस हवालदार आणि सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे राजश्री घोडे (महिला पोलीस हवालदार) आणि राकेश पालांडे (सहायक फौजदार) अशी आहेत. तक्रारदार हे वकिली व्यवसाय करणारे असून त्यांच्या आशिलावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजश्री घोडे करत होत्या. आरोपीस अटक…
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी –अमोल बेडके | श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये, संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शिक्षणमहर्षी शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन १५ जुलै २०२५ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमापूजनाने झाली. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ‘नवकार महामंत्र’ व ‘ओम नमः शिवाय’ जप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती . ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी), प्रा. श्री अनिलकुमार कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी), कार्यकारिणी सदस्य प्रकाशजी बंब, तसेच…
पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी : प्रभू कांगाणे ) पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील ४५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या काळाखडक झोपडपट्टीतील सुमारे ४६ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील ९६ झोपड्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे. वाकड येथील रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या, टपऱ्या, दुकाने व वीट बांधकामे निष्कासित करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आज काळाखडक झोपडपट्टीतील २५० मीटर लांबीच्या व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर असणाऱ्या ९६ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त…
पिंपरी ( प्रतिनिधी : प्रभू कांगणे ) : गुन्हे शाखा, युनिट-५ पिंपरी चिंचवड यांनी अवघ्या आठ दिवसांत घरफोडी प्रकरणातील चार अट्टल चोरांना अटक करत तब्बल २५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे. शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गु. रजि. नं. १९०/२०२५, भादंवि कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि श्रीधर भोसले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे नेत अल्टो कार (MH 12 CD 2165)…
चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवड येथे आज गुरुपौर्णिमा आणि चातुर्मास प्रारंभ यांचा दुग्धशर्कर योगाने उत्सवमय वातावरणात संयुक्त आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्व शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरु-शिष्य जोड्यांच्या माध्यमातून भारतीय परंपरेचा गौरव करण्यात आला. “गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या आठवणीने मन नम्र करणारा असतो. गुरू म्हणजे मार्गदर्शक – आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप. या दिवशी मातृ पूजन करून आईचाही सन्मान केला जातो. कारण आई…
चिंचवड (प्रतिनिधी : प्रभु कांगने ) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिर व शिशुविहार विभाग यांचा पालखी सोहळा मंगळवार दिनांक ०५ जुलै २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या नादात आणि वारकरी-साधुसंतांच्या पारंपरिक वेषभूषेत शाळेच्या प्रांगणात दिंडी काढली. अभंग, भजने आणि भक्तिगीते गात त्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी सौ. ज्ञानेश्वरी मोहिते (गायिका), मा. श्री. विकास महाराज गोडसे (पखवाज वादक), आणि चि. हरिदास मोहिते यांनी सुरेल भावगीत सादर करून कार्यक्रमाची शान वाढवली. कार्यक्रम यशस्वी…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पुणे : राजकारण हे भावनांचं, आकांक्षांचं आणि जनतेच्या अपेक्षांचं मैदान असतं. या मैदानात प्रत्येक उमेदवाराला आपली बाजू प्रभावीपणे मांडायची असते – आणि हे शक्य होतं रणनीती, नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून. हाच विश्वास घेऊन गेली १४ वर्षं प्रचार क्षेत्रात आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारी संस्था म्हणजे LEIDTECH (चाणक्य नीति). “गल्ली ते दिल्ली” – म्हणजे कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंतचा प्रवास, तोही जिंकण्याच्या संकल्पाने. LEIDTECH च्या योजनाबद्ध प्रचारसाहित्य, रणनीतीपूर्ण सर्व्हेक्षण, मतदारांशी थेट संपर्क, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर यामुळे अनेक उमेदवारांनी निवडणुकीत यशस्वी झेंडा रोवला आहे. 🧠 चाणक्य नीति – प्रचाराची शास्त्रशुद्ध दिशा: LEIDTECH ही केवळ एक प्रचार…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी श्री खंडोबा मंदिर चौक या सेवा रस्त्यावर मोठमोठाले जीवघेणे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा काटे यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटो गेटजवळ तीव्र घंटा नाद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून, रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात लक्षवेधी ठरले आहे. यावेळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ननावरे यांना निवेदन…
|| प्रतिनिधी – प्रशांत शाहा || गडचिरोली : चामोर्शी शहरातील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. या प्रकारामुळे महाविद्यालयीन वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिकेत गजेंद्र सोनटक्के (वय २४, रा. आरमोरी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो पदवी पूर्ण करण्यासाठी या खाजगी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या प्रकरणात तुषार भांडारकर व पवन दुधबावरे या दोन शिक्षकांचे नाव समोर आले असून, त्यांनी अनिकेत याला सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर सतत अभ्यासासंबंधी अमानवी दबाव आणणे,…
|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात पुणे (Pune) तिथं काय उणे असं म्हणतात. मात्र, गेल्या काही महिन्यात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, एका 28 ते 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारिरीक संबंधात होते. मात्र, त्या दिवशी मुलीची इच्छा…