चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवड येथे आज गुरुपौर्णिमा आणि चातुर्मास प्रारंभ यांचा दुग्धशर्कर योगाने उत्सवमय वातावरणात संयुक्त आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्व शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरु-शिष्य जोड्यांच्या माध्यमातून भारतीय परंपरेचा गौरव करण्यात आला.
“गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या आठवणीने मन नम्र करणारा असतो. गुरू म्हणजे मार्गदर्शक – आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप.
या दिवशी मातृ पूजन करून आईचाही सन्मान केला जातो. कारण आई हीच आपली पहिली गुरू असते. तिनेच आपल्याला बोलायला, चालायला आणि चांगले संस्कार शिकवले.
गुरू आणि आई – दोघांचेही आपल्यावर अमुल्य उपकार आहेत. म्हणूनच गुरुपौर्णिमा ही कृतज्ञतेचा आणि संस्कारांचा उत्सव आहे.”

या प्रसंगी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी मा. प्रा. श्री. अनिल कुमारजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनीषा जैन यांनी केले.
विद्यार्थी रमण कुलकर्णी, विराज गाजरे यांनी गुरुपौर्णिमा व चातुर्मासावरील माहिती सादर केली. शिक्षिका पूजा तानावडे आणि ज्योती छाजेड मॅडम यांनी कथा व बोधकथांद्वारे विचार प्रभावीपणे मांडले.

प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया यांनी माहितीपर भाषण व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुहासिनी घाडगे यांनी केले.
