|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे, ||
पंढरपूर ,भटुंबरे : जय हनुमान गणेश उत्सव तरुण मंडळ भटुंबरे–९९९ यांच्या वतीने यंदाही मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवसांच्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यातील विशेष आकर्षण ठरला ‘होम मिनिस्टर’ हा महिलांसाठीचा उपक्रम. गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
विजेते पुढीलप्रमाणे :
प्रथम : कल्पना संगीत – पैठणी
द्वितीय : तेजल घोगरे – सोन्याची नथ
तृतीय : अश्विनी परचंडे – शेगडी
चतुर्थ : वर्षा गुटाळा – टेबल फॅन
पाचवा : नीलम वाघमारे – किचन डबा

याशिवायही अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे संपूर्ण उत्सव यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चंद्रराव यांनी केले.
