Author: shauryavartanews2025@gmail.com

पिंपरी-चिंचवड : प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रज्ञा विद्यामंदिर, गणेश नगर, थेरगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. (नितीन भाऊ गवळी) यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गंभीर (क्रिटिकल) आजार आढळल्यास त्याच्या पुढील उपचाराचा संपूर्ण खर्च शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी किंवा त्यांच्या कार्यकारिणीमार्फत करण्यात येईल, अशी ठाम वचनबद्धता यावेळी जाहीर करण्यात आली. हा कार्यक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, शहरातील नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि संवेदनशीलता दर्शवणारा उपक्रम ठरला. “वाढदिवस हा दिखाव्यासाठी नाही, तर समाजासाठी” हा संदेश या…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पिंपरी-चिंचवड : अवैध शस्त्रधारकांवर धडक कारवाई करत गुन्हे शाखा युनिट 01 ने काळेवाडी परिसरात एक महत्त्वपूर्ण ऑपरेशन राबवून देशी बनावटीचे कट्टा व जिवंत राऊंड बाळगणाऱ्या युवकाला रंगेहाथ पकडले आहे. महापालिका व पोलिस आयुक्तालय हद्दीतील सुरक्षेच्या दृष्टीने वाढत्या शस्त्रप्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत मोलाची ठरत आहे. घटनेनुसार, दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 01 चे पथक नियमित पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, पोलीस हवालदार सागर अवसरे व पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे यांना त्यांच्या विश्वसनीय गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, रोहित महादेव आगरखेड (वय 22, रा. पवनानगर, काळेवाडी) हा इसम अवैधरित्या शस्त्र बाळगून परिसरात फिरत…

Read More

बाटीॅ पुणे समाज कल्याण व सामाजिक न्याय विभाग तसेच विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान संविधान जागर सप्ताह उत्साहात व यशस्वीपणे साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत समतादूतांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानाचा प्रचार–प्रसार करण्यात आला. प्रत्येक शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क–कर्तव्ये आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या याबाबत माहिती देत संविधान कायम टिकून राहावे यासाठी नागरिकांची बांधिलकी महत्त्वाची असल्याचा संदेश देण्यात आला. सप्ताहात व्याख्यान, प्रबोधनपर कार्यक्रम, पोस्टर स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले. तसेच ‘हर घर संविधान’ या उपक्रमांतर्गत…

Read More

|| प्रतिनिधी : विशाल शेळके || पिंपरी :  ७ डिसेंबर २०२५ सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड पिंपरीच्या सभासदांचा प्रथम मेळावा संत तुकाराम हॉल (संत तुकाराम नगर) पिंपरी येथे (दि.७) पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने बँकेची सभासद उपस्थित होते. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार, सभासद, ठेवीदार व खातेदार यांच्यावतीने सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी संचालक संपतराव बुवाजीराव ओव्हाळ यांची निवड करण्यात आली.यावेळी कामगारनेते यशवंतभाऊ भोसले,माजी संचालक अशोक दखनेजा, माजी संचालक व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज, नंदू आप्पा कदम यांची भाषणे झाली. यावेळी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, सेवा विकास बँकेतील बहुमतातील कर्मचारी…

Read More

मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. लाखो प्रवासी दररोज मुंबई लोकलने प्रवास करतात. पण प्रवास करत असताना लोकल ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करु नये, असं नेहमी आवाहन केलं जातं. पण तरिही काही जणांकडून लोकल ट्रेनला लटकून जीवघेणा प्रवास केला जातो. अशाप्रकारे प्रवास करणं नालासोपाऱ्याच्या दोन मित्रांना जीवावर बेतलं आहे. लोकल ट्रेनमधून पडून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. नालासोपाराहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, कायम भेडसावणाऱ्या धोक्याची जाणीव करून देणारी भीषण घटना नालासोपारा-वसईदरम्यान घडली आहे. लोकलमधून पडल्याने दोन तरुणांना जीवघेणे पडसाद भोगावे लागले.…

Read More

पिंपरी- चिंचवड : हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. भरधाव बस थेट फुटपाथवर चढली आणि पायी जाणाऱ्या नागरिकांना जोराची धडक दिली. या दुर्घटनेत दोन लहानग्या शाळकरी भावंडांचा मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अर्चना देवा प्रसाद (वय ८), सूरज देवा प्रसाद (वय ६) तर गंभीर जखमींमध्ये प्रिया देवा प्रसाद (वय १८) आणि पादचारी अविनाश चव्हाण यांचा समावेश आहे. बसमधील काही प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या रस्त्यावर झाला. आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस भरधाव वेगात असताना चालक मद्यधुंद असल्याने त्याचे…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || माढा : “मतदारसंघाच्या विकासासाठी ठेवलेले व्हिजन आता अंतिम टप्प्यात असून, आमदारकी फक्त निधीपुरती मर्यादित मानण्याऐवजी गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करून त्यांना मार्ग काढून देण्याचे काम केले,” असे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे माढा शहरात आयोजित कृषी व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. विधानसभेच्या प्रत्येक दिवशी हजर राहून तारांकित, अतारांकित, लक्षवेधी मुद्दे, औचित्याचा प्रश्न, २९३, १९२, ९४, १०१ अशा विविध माध्यमांतून लोकहिताच्या विषयांना पुढे नेल्याचे त्यांनी नमूद केले. एसटी पार्सल सेवा, दुधातील भेसळ, ऑनलाईन गेमिंग अशा थेट सामान्य जनतेशी निगडित प्रश्नांना शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मार्ग उपलब्ध करून दिला,…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || “फुलांसारखी कोवळी लेकरं, हास्यांनी भरतील जग सारं… बालदिनाची आली चाहूल, मुलांच्या आनंदाने खुलला सारा माहोल” ! पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या श्री गुरु गणेश बालक मंदिर व सेठ श्री रतिलाल विठ्ठलदास गोसलिया शिशुविहार येथे गुरुवारी बालदिन उत्साह, आनंद आणि खेळांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात सकाळपासूनच मुलांच्या किलबिलाटाने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री. राजेन्द्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि चेअरमन, शालेय शिक्षण समिती मा. प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक बालदिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाला शुभारंभ केला. विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली खाऊगल्ली हा…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवडे नगर  : दगडोबा चौक, चिंचवडे नगर परिसरात झालेल्या वाहनतोडफोडीच्या वाढत्या घटनांनंतर चिंचवड पोलिसांनी अतिशय वेगाने आणि अचूक तपास करून अवघ्या काही तासांत सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत त्यांच्या कार्यक्षमतेवर दृढ विश्वास व्यक्त केला आहे. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी केले. त्यांच्यासह वाल्हेकर वाडी पोलीस चौकीचे अधिकारी आणि तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली. घटना घडल्यानंतर एसीपी साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना तातडीने अटक करण्याचे कडक आदेश दिले. त्यानुसार तपास पथकाने परिसरातील…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवडे नगर : दगडोबा चौक, चिंचवडे नगर परिसरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या भागात आतापर्यंत चार वेळा वाहनांचे नुकसान झाले असून, आज पुन्हा काही गाड्यांची अज्ञात miscreants कडून तोडफोड करण्यात आली आहे. या वाढत्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांत प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. तोडफोडीत टुरिस्ट गाड्या, पिकअप, रिक्षा तसेच खासगी वाहनांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. टुरिस्ट गाड्या कंपनीकडून ड्रायव्हर्सकडे राहण्यासाठी दिल्या जात असल्याने त्यांच्या पार्किंगवेळी रात्रीच्या वेळेत ही तोडफोड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागात वारंवार घडणाऱ्या घटनांनी पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.…

Read More