Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकर वाडी येथील कृष्णाई कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या तपास सुरू आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा गडचिरोली :-  विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या खैरे कुणबी समाजाच्या महाअधिवेशनात ओबीसी नेते, प्रभावी वक्ते आणि कुणबी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व प्रशांत वाघरे यांना “समाजभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. हा भव्य सोहळा स्वर्गीय विमलताई देशमुख सभागृह, धनवटे नॅशनल कॉलेज, नागपूर येथे संपन्न झाला. पुरस्कार स्वीकारताना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रशांत वाघरे म्हणाले,”हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील समस्त कुणबी समाज बांधवांचा आहे. समाजाने दाखवलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे, आणि हा विश्वास कायम राखण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.” ते पुढे…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा || गडचिरोली :- चंद्रपूर जिल्ह्याच्या व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला.त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला .त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना काल,शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर,२.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज, छत्रपती संभाजीनगर अशी वैनगंगा नदीत बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. पार्थ जाधव,गोपाल साखरे,स्वप्निल शिरे,पवन सतकार,सुजित देशमुख,शिवम जायभाये,सार्थक पाठक व जुनेद शेख हे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे मा. उपाध्यक्ष श्री शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी एक समाजहितकारी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व आ. भा. (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी करून देण्यात येणार असून, यामार्फत गरजूंना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, हा एक सामाजिक बांधिलकीचा आणि लोकसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श आहे. नोंदणी व माहितीचे ठिकाण: शेखर अण्णा चिंचवडे जनसंपर्क कार्यालय, अपर्णा कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवड नगर.…

Read More

इंदापूर : इंदापूर शहरातील डॉ. भाग्यश्री चव्हाण हिने जिद्द आणि कष्टाच्या बळावर यश मिळवत शहरातील पहिली महिला एम. एस. सर्जन होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. भाग्यश्रीने नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील एम. एस. सी. पदवी मिळवली. ती शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर या केंद्राचे प्रमुख व सेवानिवृत्त शिक्षक महादेव चव्हाण व शिक्षिका वैशाली चव्हाण यांची कन्या आहे. भाग्यश्रीने शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ मध्ये पहिली ते चौथीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पाचवी ते १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथील एच.…

Read More

|| प्रतिनिधी क्षितिजा देव || पुणे : रोज घरी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी येणार्याने घरात कोणी नाही हे पाहून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी या पाव विक्रेत्याला अटक केली आहे. समसाद खॉ (रा. यशोदीप चौक, वारजे माळवाडी) असे या पाव विक्रेत्याचे नाव आहे. याबाबत एका ४५ वर्षाच्या महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता फिर्यादीच्या घरी झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समसाद खॉ हा नेहमी पाव व ब्रेड विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे येत असतो. २ मे रोजी फिर्यादी…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||  पिंपरी चिंचवड : नांदेड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कलरीपायट्टू स्पर्धेत पिंपरी चिंचवड कलरीपायट्टू असोसिएशनच्या खेळाडूंनी भव्य कामगिरी करत एकूण 11 पदके पटकावली. विशेष म्हणजे या यशामुळे सर्व 11 खेळाडूंची केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कलरीपायट्टू स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंमध्ये खालीलप्रमाणे कामगिरी झाली: 1. वर्तिका पाटील – 1 सुवर्ण, 1 कांस्य 2. श्रेया दंडे – 1 रौप्य 3. प्रिया सैनी – 1 कांस्य 4. निक्षिता पाटील – 2 कांस्य 5. तनिष्का ठोंबरे – 1 कांस्य 6. स्नेहल मर्दाने – 1 सुवर्ण, 1 कांस्य 7. वैदेही नवले – 1 रौप्य 8. ओमराजे जाधव…

Read More

|| प्रतिनिधी – अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड : दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी यमुनानगर, निगडी येथील मिनाताई ठाकरे क्रीडा संकुलात खुल्या राज्यस्तरीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यातील सात जिल्ह्यांमधून २०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ५० खेळाडूंनी विविध प्रकारात आपले कौशल्य दाखवत पदके जिंकली. लाठी लढत, लाठी फिरविणे, सुराला फिरविणे, तलवार चालवणे, भाला फिरविणे अशा पारंपरिक प्रकारांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत मुंबई उपनगर संघाने प्रथम क्रमांक पटकावत अजिंक्यपद मिळवले. द्वितीय क्रमांक जालना जिल्ह्याने तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्याने मिळवला.…

Read More

ठाणे : जन्मदात्या आईने आपल्या तीन मुलींसह जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील फेणे गावच्या हद्दीत घडली. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेतल्याचे समोर आले आहे. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. अधिक माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (व-३२) व मुली नंदिनी (व-१२),नेहा (वय -७) व अनु (वय -४) यांसोबत राहत होता. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो घरी…

Read More

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका चिमुकलीने ३ वर्षे, ४ महिने आणि १ दिवसाच्या वयात संथारा केला आहे. असं करणारी ती पहिली मुलगी आहे जिने इतक्या लहान वयात संथारा घेतला आहे. संथारा घेतल्यानंतर १० मिनिटांनी चिमुकलीने आपला जीव दिला. 3 वर्षांच्या वियानाला अभिग्रहधारी राजेश मुनींनी संथारा दिला होता. वियानाला ब्रेन ट्यूमर होता. जानेवारी महिन्यात, कुटुंबाने तिच्यावर मुंबईत व्हिएन्नाचे ऑपरेशन केले. शस्त्रक्रियेनंतर व्हिएन्नाची प्रकृती काही दिवस ठीक राहिली. पण मार्चमध्ये जेव्हा त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली तेव्हा कुटुंबीय त्यांना राजेश मुनी यांच्याकडे घेऊन गेले. राजेश मुनी यांनी वियानाच्या कुटुंबाला सल्ला दिला की वियानाला संथारा द्यावा. वियानाची अवस्था पाहून राजेश मुनी म्हणाले होते…

Read More