Author: shauryavartanews2025@gmail.com

मुंबई : टीम इंडियाने 6 विकेट राखून न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने तब्बल 12 वर्षानंतर ही ट्रॉफी जिंकली आहे. त्याचसोबत 2000 साली न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या पराभवाचा बदला आज टीम इंडियाने 25 वर्षानंतर घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा विजय आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि चायनामॅन कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती ठरला आहे. कारण धावांचा पाठलाग करताना रोहितने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर अय्यरने 48 धावांची खेळी केली आहे. तर गोलंदाजी दरम्यान कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी 2 विकेट…

Read More

|| प्रतिनिधी : राजेश वाईकर || मुंबई : आज जागतिक महिला दिन… नारीस्त्रीचे कौतुक करणारा दिन मात्र या जागतिक महिलादिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक आगळीवेगळी मागणी केली आहे. आम्हाला खून करण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केली आहे. याबाबतचे एक पत्र त्यांनी सोशल मीडियावर प्रकाशित केले आहे. रोहिणीताई खडसे यांचे राष्ट्रपतींना पत्र सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : भर रस्त्यात रात्री बाराच्या ठोक्याला सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते. या गुन्हेगारांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अन्य सहकारी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यासमोर गुन्हेगांरासोबत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलीस अंमलदाराला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री बाराच्या ठोक्याला पाटील यांच्या…

Read More

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला सिमेंटच्या ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात वृद्ध महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावडा कोल्हापूर मार्गावर निगडेवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी सकाळी ११. ४९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात मुगाबाई निगडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुगाबाई निगडे या रस्त्याच्या बाजूने जात होत्या. पण त्याचवेळी पाठीमागून काँक्रिट मशीन ट्रक आला आणि मागून निगडे यांना धडक दिली. ट्रकची धडक बसल्यानंतर मुगाबाई निगडे या खाली पडल्या अन् काही…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वारंवार येणाऱ्या गुन्हेगारीच्या बातम्यांनी महाराष्ट्र अक्षरश: ढवळून निघाला आहे. संतोष देशमुखांवरील निघृणपणे केलेल्या अत्याचाराचे फोटो प्रसारमाध्यमातून समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला. इतक्या क्रूरपणे कोणी कोणाचीही हत्या कसं करू शकतं? असा सवाल ते फोटो पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला होता. स्वारगेट बस स्टँडवरील तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतून महिला सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरहून महाराष्ट्राला हादरवणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एका 19 वर्षांच्या विकृत मानसिकतेच्या तरुणाने 36 वर्षांच्या विवाहित तरुणीच्या शरीरावर धारदार चाकूने वार केले. अभिषेक तात्याराव नवपुते असं या मुलाचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

लखनऊ : महाराष्ट्रातील समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले आहे. विधानसभेतून त्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशापर्यंत उमटले आहेत. औरंगजेबाच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेश विधानसभेतही राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या पाचव्या दिवशी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमींवर टीका केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पार्टी औरंगजेबाला आदर्श मानत आहे. औरंगजेबाच्या पित्याने शाहजहांने त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, खुदा करे की ऐसा कमबख्त किसी को पैदा न हो,…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया मान्यताप्राप्त तसेच राष्ट्रीय खेळ शालेय खेळ यादीमध्ये समाविष्ट असलेल्या गतका या पारंपरिक खेळाच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा गतका असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने यशसवी रित्या आयोजीत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते. पिंपरी चिंचवड महपालिकेच्या हद्दीमध्ये पारंपारीक खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये फरी सोटी (काठीची लढत) तलवारबाजी, काठी फिरविणे अशा वयक्तिक खेळ प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे मातृ विद्यालय वाल्हेकर वाडी, पार्वती इंग्लिश स्कूल काळेवाडी, अभंग…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतिराम कांबळे || पंढरपूर : आज दुपारी पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी भक्त निवास मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सुरू असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणारे पंढरपूर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव व महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत येऊन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी श्री.शेळके व व्यवस्थापक श्री.श्रोत्री यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करताना मंदिर समितीच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी ची वेळ वाढवून दिली जात नाही, मंदिराचे संवर्धनाचे कामात घोटाळा आहे, मंदिर समितीकडून महिला भाविकांसाठी अत्यावश्यक…

Read More

|| प्रतिनिधी : किरण आडागळे || पुणे : अभिनेता अल्लू अर्जूनच्या प्रमुख भूमिकेतील पुष्पा (Pushpa) सिनेमा तुफान गाजला. चंदनतस्करीशी संबंधित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. त्यामुळे, पुष्पा 2 सिनेमाची प्रतिक्षा सर्वांना होती. नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुष्पा 2 सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेचाहत्यांनी त्यालाही भरभरुन दाद दिली. त्यामुळे, चंदनतस्कर पुष्पाची भुरळच चाहत्यांना पडल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे (Pune) पोलिसांनी चंदनतस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टरमाईंड वा म्होरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं कंटेनर भरुन चंदन जप्त करण्यात आलं आहे. आता, या चंदनतस्कीरच्या सिंडीकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पुण्यातील…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पुणे : विवाहास नकार दिल्याने तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात नुकतीच घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणीविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गणेश राजू सिंग (३०, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरहीन इफ्तेखार अन्सारी (२६, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंग याची बहीण गौरी राजेंद्र कांबळे (३३, रा. इंदिरानगर, ससाणेनगर, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याची आई वैदूवाडी भागात राहायला आहेत. त्याची…

Read More