|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : केंद्र शासनाच्या खेलो इंडिया मान्यताप्राप्त तसेच राष्ट्रीय खेळ शालेय खेळ यादीमध्ये समाविष्ट असलेल्या गतका या पारंपरिक खेळाच्या जिल्हा स्तरीय स्पर्धा गतका असोसिएशन पिंपरी चिंचवड यांच्या वतीने यशसवी रित्या आयोजीत करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवड महपालिकेच्या हद्दीमध्ये पारंपारीक खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

यामध्ये फरी सोटी (काठीची लढत) तलवारबाजी, काठी फिरविणे अशा वयक्तिक खेळ प्रकाराचा समावेश करण्यात आला होता.
यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे मातृ विद्यालय वाल्हेकर वाडी, पार्वती इंग्लिश स्कूल काळेवाडी, अभंग इंग्लिश स्कूल देहूगाव यांनी पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन मातृ विद्यालय, वाल्हेकर वाडी चे एज्युकेशन डायरेक्टर डॉ. श्रीधर साईनाथ यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिंपिक हॉकी खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेत्या रेखा भिडे मॅडम या उपस्तीत होत्या त्याचं बरोबर उद्योगपती संदीप अलंकार, किशोर शहापूरकर, अमित वायाळ, ऋषिकेश चिकने, एल्बो बॉक्सिंग फेडरेशन इंडिया चे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या हस्ते विजयी खेळाडूंना बक्षीस देण्यात आली.

या स्पर्धेचे संपूर्ण कामकाज हे राष्ट्रीय गतका पंच स्मिता धिवार, सहकारी रविराज चखले, निखिल चव्हाण गणेश गेजगे यांनी पाहिले. गतका असोसिएशन पिंपरी चिंचवड चे पदाधिकारी संजय बनसोडे, किरण अडागळे, केतन नवले, गणेश चखाले, अभय नवले, डॉ. अजय नवले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

विजयी खेळाडू मुलांची नावे
खेमांशू महाजन, चैतन्य निकम, विराज कुंभार, कार्तिक न्हावी, अर्णव पाटील, प्रिन्स कांबळे, विराज अडागळे, मोहित पाटील, अहमद पटेल, श्रेयश धाबेकर, स्वराज अडागळे, अंश दोडतले, राज वायकोळे, संकेत सोळणकर, अरव बेडगे, ध्रुव घोडे, नैतिक ऊनेचा, सुदर्शन कोळी, ओमराजे जाधव, आरंभ देवरुखे, सोहम चोळकर, काशिनाथ हेळवे, यश बालगुडे, सोहम मर्दाने, क्षितिज गुरव, लकी शिंदे, आरुष भांडारकर, हर्ष पांचाळ, तन्मय जगताप, रुद्र गुरसाळ, ऋषिकेश विश्वकर्मा, कृष्णा परदेशी, शिवदत सिंग, ओम परदेशी, निखिल विश्वकर्मा, श्रेयस चव्हाण, निंगजा मालिवाल, संघर्ष कोळी, उज्वल भोसले
विजयी खेळाडू मुलिंची नावे
तृप्ती यादव, ऋतुजा कुलकर्णी, तान्सी ठोंबरे, त्रिशा राजपूत, आरोही मांडलिक, प्रतीक्षा कांबळे, अनन्या हेळवे, प्रिया सैनी, निक्षिता पाटील, निशा चौधरी, आर्या गायकवाड, तनिष्का ठोंबरे, श्रेया दंडे, कोमल चौधरी, स्नेहल मर्दाने, अनिशा देवरुखे, समृद्धी राजपूत, असावरी जाधव.
