- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा देणाऱ्या कामगारांना अचानक कामावर येण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या स्थानावर समितीने आपल्याच मर्जीतील लोकांना कामावर घेतले आहे. या अन्यायाविरोधात जुन्या कामगारांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार बोंबाबोंब आंदोलन छेडले. “न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. कामगारांच्या भावना व त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील संतप्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : 15 जून 2025 रोजी दुपारी चिंचवडे नगर परिसरात एका भंगार दुकानाला लागलेल्या आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भयानक होती की तिच्या आहारी शेजारील फर्निचर दुकान, डेकोरेशनचे गोडाऊन आणि काही अंतरावर असलेली रहिवासी इमारतही आली. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व उष्णता निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचा भडका इतका प्रचंड होता की काही रहिवाशांना घाबरून पहिल्या मजल्यावरून उड्या माराव्या लागल्या. महिलांनी व घरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील सिलेंडर, फ्रीज, वायरींग व महत्त्वाचे साहित्य तातडीने बाहेर काढले. यामुळे मोठी जीवितहानी टळली, परंतु शेकडो नागरिकांच्या जिवावर बेतलेली ही परिस्थिती…
मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. रविवारी रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफकडून (NDRF Team) बचावकार्य सुरु होते. सध्या याठिकाणी बचावकार्य थांबवण्यात आले असून ड्रोनद्वारे नदीत आणखी कोणी नागरिक अडकला आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटना घडल्यानंतर सरकार एकाच छापाच्या प्रतिक्रिया देते. मात्र, त्यापूर्वी सरकार काय करते, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं? काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ…
पुणे : दौंडहून पुण्याला येणाऱ्या डेमू (DEMU) ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी एक थरारक घटना घडली. सकाळी 07:05 वाजता दौंडवरून निघालेल्या शटल ट्रेनच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेमुळे ट्रेनमध्ये काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. डेमू (DEMU) ट्रेनच्या टॉयलेटमध्ये आग लागली त्याचवेळी एक प्रवासी आत होता. दुर्दैवाने दरवाजा लॉक झाल्यामुळे तो बाहेर पडू शकत नव्हता. काही वेळातच टॉयलेटमधून धूर बाहेर येऊ लागला आणि आतमधील व्यक्तीचा आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला. हे लक्षात येताच गाडीत असलेल्या काही सतर्क प्रवाशांनी प्रसंगावधान राखत त्या दरवाज्याकडे धाव घेतली. यानंतर काही प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला.…
छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना रिक्षा चालविण्यास देणाऱ्या मालकावरही यापुढे कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शनिवारी दिला होता. त्यानंतर छावणी भागात रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याच्या गुन्ह्यात रिक्षा मालकाला छावणी पोलिसांनी रविवारी (दि.१५) अटक केली. सय्यद मझरोद्दीन सय्यद अलिमोद्दीन (३०, रा. राहुलनगर, गल्ली क्र ३, रेल्वेस्टेशन) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मयत जयराम बबन पिंपळे (२७, रा. वडाळा, श्रीरामपूर, जि. नगर) हा ३ जूनला जेजे हॉस्पिटल येथे आला होता. ४ जूनला त्याची शिक्षण पात्रता परीक्षा असल्याने तो मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाबा पंपाजवळ गेला. तेथून त्याने वाळूज पंढरपूर जाण्यासाठी…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : जागतिक आरोग्य संघटनेद्वारे 2004 पासून दरवर्षी 14 जून हा दिवस प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते व रक्तगट शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. कार्ल लँडस्टिनर यांच्या जन्मदिनी “जागतिक रक्तदाता दिन” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आणि ऐच्छिक रक्तदाता शपथवाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. “रक्त देऊया, आशा जागवूया : एकत्रितपणे जीव वाचवूया!” या संकल्पनेवर आधारित यंदाचा जागतिक रक्तदाता दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात एकूण ५८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वाय.सी.एम. हॉस्पिटलचे…
केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे रविवारी पहाटे हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण दरम्यान कोसळले. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेची ही घटना सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गौरीकुंड परिसरात घास कापणाऱ्या महिलांनी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती दिली. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी पोलिस, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने दाखल झाली. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे वारंवार होणाऱ्या…
पुणे : पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि एका गँगचा सक्रिय सदस्य शाहरुख उर्फ अट्टी रहीम (वय 23) याचा सोलापूरजवळील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत ही घटना घडली. या कारवाईने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. लांबोटीत रात्रीच्या सन्नाट्यात चकमक पुणे पोलिसांना काही दिवसांपूर्वी गुप्त माहिती मिळाली होती की, शाहरुख उर्फ अट्टी रहीम हा सराईत गुन्हेगार सोलापूरजवळील लांबोटी गावात आपल्या नातेवाईकाकडे लपून बसला आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, ज्यात खून, खंडणी आणि बेकायदा शस्त्र बाळगण्यासारखे आरोप समाविष्ट आहेत. या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेचे पथक तातडीने लांबोटी येथे रवाना…
आई-वडील मुलांना उघडं-नागडं पाहतात, पण एका मुलाने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहणे तो प्रसंग व्यक्त करायला शब्द नाहीत. २०१६ मध्ये पप्पांना हृदयविकाराचा झटका आला. बायपास शस्त्रक्रिया सुरु होती. त्या दिवशी मी आठ तास ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांच्या सोबत होतो. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण होता. त्यांच्या धडधडणाऱ्या काळजावर चाललेली ही लढाई… माझ्यासाठी तो रुग्ण कुणी अनोळखी नव्हता, तो माझा बाप होता. त्या क्षणी एक मुलगा म्हणून नव्हे, तर डॉक्टर म्हणून मी तिथे होतो. त्यावेळेला मी बाहेर पडलो असतो तर मम्मी, भाऊ सगळ्यांनी मला प्रश्न केले असते. त्यामुळे पप्पांना या परिस्थितीतून बाहेर काढणे ही माझी जबाबदारी होती. या सगळ्या प्रसंगाने मला…
पुणे : कात्रजमधील सुखसागर नगर परिसरात यशश्री सोसायटीसमोर आज (शुक्रवारी) दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात श्रेया गौतम येवले (वय २१, रा. शीतल हाईट्स, खंडोबा मंदिराजवळ, कोंढवा, पुणे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव टुरिस्ट वॅगन आर कारने (क्र. एमएच १२ यु. एम. ४८४७) फुटपाथवर चालणाऱ्या श्रेयाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळ नगर) मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसला. यावेळी कार नारळाच्या झाडाला धडकून समोर असलेल्या बदामाच्या झाडात अडकली. झाड आणि कारच्या मध्ये सापडून श्रेयाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि…