- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
पंढरपूर (प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे): वाखरी (ता. पंढरपूर) येथील एका व्यापाऱ्याने खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खाजगी सावकारी अधिनियम, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश कांबळे (व्यवसाय – चप्पल दुकान, वाखरी) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये लुंगीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येनंतर त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत सावकारांची नावे लिहिलेली आढळली. त्यामध्ये भारत हिलाल (रा. पंढरपूर), विकी अभंगराव, बंडू भोसले, शिवाजी गाजरे, गायकवाड आणि संजय व्यवहारे अशी नावे नमूद आहेत. या…
पंढरपूर (प्रतिनिधी ज्योतीराम कांबळे) : “आदिवासींच्या नोकऱ्या बोगस जातीच्या दाखल्यांनी बळकावल्या जात आहेत, निधी वळवला जातोय, विकासाची गंगा पाड्यापर्यंत पोहोचत नाही… हे अन्याय आता थांबलेच पाहिजेत” असा स्फोटक इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव गिते यांनी खालापूर येथे दिला. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त खालापूर येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तालुक्यातील सर्व गावांतील हजारो आदिवासी बांधव व भगिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले. सततच्या पावसात, चिखलात आणि बसण्याची सोय नसतानाही बांधव आठ तास ठामपणे उभे राहून ऐक्याचे दर्शन घडवत होते. सांस्कृतिक कार्यक्रमांतून बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल यांसारख्या महापुरुषांचे कार्य सादर झाले. उच्च शिक्षित आदिवासी…
पंढरपूर ( प्रतिनिधी : ज्योतिराम कांबळे ) – हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत पंढरपूर नगरपरिषदेकडून ३२,५०० वृक्ष लागवडीचे भव्य उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या मोहिमेस १ ऑगस्ट २०२५ पासून अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील पद्मावती उद्यान कॉर्नर ते बडोदा बँक स्टेशन रोड या मार्गावरील रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ पंढरपूर साकारण्यासाठी नगरपरिषदेकडून नियोजनबद्ध पद्धतीने विविध भागांत वृक्षारोपणाची अंमलबजावणी केली जात आहे. या कार्यक्रमास मा. मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी, नगर अभियंता प्रकाश केसकर, पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे, लेखापाल करुणा शेळके, लेखापरीक्षक प्रशांत…
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : प्रभू कांगणे ): भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ५ यांच्या संयुक्त कारवाईत भोसरीतील औद्योगिक भागात घडलेल्या तब्बल ४० लाख ५० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना ११ जुलै २०२५ रोजी ब्राईट इंडिया टूल्स नावाच्या दुकानात घडली होती. या दुकानातून ४०,५०,००० रुपये किंमतीचे कार्बाईड टूल्स व ईन्सर्ट मटेरिअल चोरीस गेले होते. या प्रकरणी फिर्यादी बालाजी गौरीशंकर हलकुडे (वय ४०, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून गु.र.नं. ३९६/२०२५ नुसार भा.दं.सं. २०२३…
पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : शुभम जाधव ) : शहरातील चापेकर चौक येथील नायट्रो जिममध्ये व्यायाम करताना एका ३७ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. मिलिंद कुलकर्णी असे या तरुणाचे नाव असून, ते नियमितपणे जिममध्ये व्यायामासाठी येत असत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास मिलिंद कुलकर्णी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवल्या. काही क्षणांतच ते खाली कोसळले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर त्यांना तातडीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी ते मृत घोषित केले. शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, कुलकर्णी यांच्या पत्नी या…
पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) : शहरात दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश ककराणी (वय २०) या युवकावर त्याच्याच किराणा दुकानात घुसून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. या हल्ल्यात भावेशच्या मांडीवर गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने दुकानात शिरताच जवळून गोळीबार केला आणि लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. जखमी अवस्थेत भावेशला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली…
पंढरपूर : ( प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे ): पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे गर्दी करतात. मात्र, हेच मंदिर सध्या पान, तंबाखू, गुटखा खालून थुंकणाऱ्यांच्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळे अपवित्र होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी स्वतः पाहिला असून, त्यांनी या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रांसह सोशल मीडियावर सार्वजनिक पर्दाफाश केला आहे. त्यांनी मंदिर प्रशासन, समिती आणि जिल्हा यंत्रणेवर गंभीर आरोप करत तातडीने चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. ❝ पावित्र्याला गालबोट लावणारे हे प्रकार असह्य! ❞ गणेश अंकुशराव हे नुकतेच…
चिंचवड : ( प्रतिनिधी : शुभम जाधव ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात चि. प्रकाश गुजर, चि. प्रथमेश ढवळे आणि चि. शिवराज चौबे यांनी वीर जवानांची वेशभूषा परिधान करून त्यांच्या शौर्याचे दर्शन घडविले. चि. कुशल बोरा या विद्यार्थ्याने ‘कारगिल विजय दिनाचे महत्त्व’ यावर मनोगत सादर…
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : अमोल बेडके ) : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पियुष अशोक कवडे (वय २३) या तरुण आयटी अभियंत्याने कंपनीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २८ जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष गेल्या एक वर्षापासून हिंजवडी फेज-वनमधील ‘ॲटलस’ या नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता. सोमवारी सकाळी त्याची मिटिंग सुरू असताना त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले आणि बाहेर पडला. काही क्षणातच त्याने थेट सातव्या मजल्यावरून उडी घेत आपले प्राण गमावले. या घटनेनंतर कंपनीत आणि परिसरात एकच खळबळ उडाली. पियुषने आत्महत्या करण्यापूर्वी एक…
पिंपरी : ( प्रतिनिधी : संजय वाईकर ) : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेट श्री आर. व्ही. गोसलिया शिशुविहार व श्री गुरु गणेश बालक मंदिरात ‘बाहुला-बाहुली विवाह’ सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात आणि बालमित्रांच्या आनंदाच्या कल्लोळात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासोबतच त्यांना सामाजिक व संस्कारक्षम शिक्षण देण्याचा उद्देश यामागे होता. कार्यक्रमात हळद, मेंदी, रुखवत, सासरवाडी, वरात, लग्न विधी अशा पारंपरिक गोष्टींचे रूपांतर बालसुलभ कृतीतून विद्यार्थ्यांनी सादर केले. गोजिरी बाहुली आणि हसऱ्या बाहुल्याच्या विवाहात मुलांनी वरातीत नाचत, गात, रंगतदार पोशाखात सहभाग घेतला. वर्गखोल्यांचे रुपांतर मांडवात आणि मंडपात झाले होते. रुखवतामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेली कलाकृती, हस्तकला, आणि सजावट विशेष लक्षवेधी…