|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी चिंचवड : आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी न्यू इंग्लिश स्कूल आणि आबासाहेब चिंचवडे कनिष्ठ महाविद्यालय येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायले आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या निमित्ताने शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विशेष म्हणजे लहान मुलांनी दिलेली देशप्रेमाने ओथंबलेली भाषणे सर्वांचे लक्ष वेधून घेतली. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि आनंदाचे अश्रू तरळले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सेनानींचा संघर्ष, त्याग आणि आजच्या पिढीची जबाबदारी याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी देशप्रेमाची भावना कृतीतून जपण्याचे आवाहन केले.

शेवटी सर्वांनी एकत्र येऊन ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण परिसरात देशभक्तीचा आणि ऐक्याचा संदेश घुमत राहिला.
