पंढरपूर प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील आमदार समाधान दादा आवताडे यांचे कट्टर समर्थक व समाजसेवक आकाश डांगे यांनी गाव वर्गणीतून एका गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अकरा वर्षीय मुलीस आर्थिक मदत केली.

मिरज येथील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली ही मुलगी नंदेश्वर येथील रहिवासी आहे. आजाराची माहिती कळताच आकाश डांगे यांनी गावातील नागरिक, व्हॉट्सअॅप व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून जनसंपर्क साधून निधी उभारला.

त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना भेट देऊन आमदार समाधान दादा आवताडे यांच्या सहकार्याने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. एका गरीब कुटुंबातील मुलीस गावातून उभारलेली ही मदत पोहोचविल्याबद्दल सर्वत्र आकाश डांगे यांच्या समाजकार्याचे कौतुक होत आहे.
