Author: shauryavartanews2025@gmail.com

लातूर : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा (वय 50) डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लातुरतील एका संशयीत व्यक्तीला (वय 55) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले, मयत अनोळखी व्यक्ती ही मानसिक स्थिती बरी नसलेला असून, तो दिवसभर भिक्षा मागून पोट भरत होता. दरम्यान, तो रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यालागत असलेल्या फुटपाथवर एका टपरीच्या आडोशाला झोपत होता. शुक्रवारी पहाटे रात्री 2 ते 5 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत मोठा दगड झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात घातला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू…

Read More

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने नाशिकमधील एका खासगी सावकाराविरुद्ध ‘मकोका’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यामध्ये अशाप्रकारे ‘मकोका’अंतर्गत खासगी सावकारावर गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सावकारावर ‘मकोका’ लावण्याची ही पहिलीच कारवाई मिळालेल्या माहितीनुसार, खासगी सावकार वैभव देवरे आणि त्याच्या पत्नीवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई केली आहे. देवरेची पत्नी सोनालीसहीत चौघांचा समावेश आहे. राज्यातील खाजगी सावकारावर ‘मकोका’ लावण्याची ही पहिलीच कारवाई आहे. नाशिकमधील सामान्य कुटुंबीयांसह राजकीय मंडळींना दिलेल्या पैशांवर 20 टक्क्यांपेक्षा जादा चक्रवाढ व्याज लाऊन वैभव देवरे वसुली करत होता. व्याजासाठी घरात घुसून महिलांचा विनयभंग करायचा व्याजाचा हप्ता देण्यास विलंब झाला तर लाखांचा दंड…

Read More

पंढरपूर : बीड आणि लातूरनंतर आता माळशिरसमध्येही तरुणाची विवस्त्र करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याला गरम सळीचे चटके देऊन त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार प्रेम संबंध किंवा अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणाच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणीला आणि अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. माळशिरस तालुक्यात पिलीव येथे आकाश अंकुश खुर्द पाटील या 28 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. माळशिरस-पिलीव रोडवर पिलीव हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये आकाश याचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेमध्ये आढळून…

Read More

बीड : शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हते,असा जावईशोध राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे मंत्री नितेश राणेंनी लावाला आहे. तर औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच चांगलाच कार्यक्रम होणार असल्याचा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. ज्यानंतर स्वपक्षीयांपासून ते विरोधकांनी राणेंवर चढाई केल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारचे मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी केलेल्या दाव्यानंतर वाकयुद्ध सुरू झाले आहे. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाची जाती-धर्मात भेदभाव केल्याचा कुठलाच पुरावा इतिहासात सापडत नाही. पण, असं असतानाही राज्याचे मंत्री असलेल्या नितेश राणेंनी एक भलताच शोध लावलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत पटाडे || पुणे : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पुण्यातील गुन्हेगारांना कायद्याचं कोणतही भय उतरलं नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच आता पुण्यात अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्यानंतर पतीचा मृतदेह पोत्यात घालून 55 किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट लावल्याचं देखील समोर आलंय. नेमकं काय काय झालं? एकदा वाचा विवाहबाह्य संबंध हडपसर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रियकर दररोज तिला लपूनछपून भेटायला येत असायचा. पण नवऱ्याचा याची काहीही खरब लागायची नाही. एक दिवस…

Read More

कोल्हापूर : व्यवसायासाठी भावाला दिलेली २६ लाखांची रक्कम परत मागितल्याच्या रागातून दीपाली अरविंद पाटील (वय ३५, भायखळा, मुंबई) यांना सख्ख्या भावाकडून मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून पळाल्याप्रकरणी फिर्यादीचा भाऊ श्रीनाथ अरविंद पाटील (वय २८, ब्रह्मपुरी, कागल) याला पोलिसांनी (Police) अटक केली. संशयित श्रीनाथ पाटील हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. त्याची नोकरी लागेपर्यंत व्यवसाय सुरू करण्यासाठी बहिणीकडून त्याने वेळोवेळी पैसे घेतले होते. ही रक्कम २६ लाख ३८ हजार रुपयांच्या घरात गेली. ही रक्कम त्याने ॲग्रो कंपनी (Agro Company), फूड कंपनीमध्ये गुंतवल्याचे तो सांगत होता. मात्र, त्याने कोणताच व्यवसाय सुरू न केल्याने बहीण दीपाली पाटील…

Read More

लातूर : बीडनंतर आता लातूरमध्येही तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लातूरच्या रस्त्यावर एका तरुणाला 5-7 जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. राजश्री बार आणि क्लबमध्ये काही तरुणांमध्ये वाद झाला, या वादानंतर तरुणाच्या डोक्यात दगड घालून तसंच तरुणाचे कपडे काढून अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसंच पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. मराठवाड्यातील बीड पाठोपाठ आता लातूरमध्येही भरदिवसा मुख्य रस्त्यावर तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात असलेल्या एका बारच्या पुढे हा थरार सुरू होता. याच ठिकाणी असलेल्या…

Read More

शिर्डी : शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या लेकानेच जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येच्या पाचव्या दिवशी ही घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची पाईपने जबर मारहाण करत हत्या केली आहे. दत्तात्रय शंकर गोंदकर असं मारहाणीतून हत्या झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, आरोपी मुलाचे नाव शुभम गोंदकर असं आहे. शुभने घरगुती वादातून त्यांना पाईपने जबर मारहाण केली. त्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाला. 6 मार्च रोजी ही घटना घडली होती. मात्र कुटुंबाकडून…

Read More

|| प्रतिनिधी : अरविंद भोंगळे || पुणे : पुण्याच्या येरवडा परिसरातील शास्त्रीनगर इथं रस्त्यावर उभं राहून लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजाचा पुणे पोलिसांनी माज उतरवला आहे. तीन दिवसांपूर्वी बड्या बापाचा मुलगा गौरव अहुजा याने शास्त्रीनगर परिसरात सिग्नलवर आपली अलिशान बीएमडब्लू कार लावली होती. कार थांबवून तो रस्त्यातच लघुशंका करण्यासाठी उभा राहिला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने अहुजाचा हा कांड आपल्या फोनमध्ये कैद केला. यावेळी माजोरड्या गौरवने कॅमेऱ्याकडे पाहून अश्लील कृत्य केलं. त्याने ऑन कॅमेरा आपलं गुप्तांग दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनंतर दुसऱ्या दिवशी गौरव अहुजाने एक व्हिडीओ जारी करत पुणेकरांची माफी मागितली. तसेच एक संधी द्यावी अशी विनंती केली. यानंतर…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : 8 मार्च, जागतिक महिला दिन ! सर्व मातांना, भगिनींना, मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला या विशेष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा ! ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते. जागतिक महिला दिनानिमित्त मर्दानी खेळ असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने मातृ विद्यालय चिंचवड येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळो इंडिया खेळाडूंचा सत्कार करण्यात…

Read More