Author: shauryavartanews2025@gmail.com

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बारामतीला जाताना दादांना घेऊन जाणाऱ्या चार्टर्ड प्लेनचा अपघात झाला यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या पार्थिवावर उद्या (दि.29) रोजी अंत्यसंस्कार केले जाणार असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्कारासाठी बारामती येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे. उद्या होणार अजितदादांवर अंत्यसंस्कार अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्याआधी अंतिम दर्शनासाठी पार्थिव शारदा प्रांगण येथे ठेवले जाणार आहे. अपघाताची बातमी समजताच शरद पवार मुंबईहून तर, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दिल्लीहून बारामतीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे दादांवर प्रेम…

Read More

पिंपरी-चिंचवड : “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले. आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ पिंपरी-चिंचवडसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.” १९९२ ते आजतगायत् सातत्याने या…

Read More

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. “आयुष्य नीट जगा, मस्तपैकी राहा अन्…”; मृत्यूपूर्वी अजित पवारांनी दिलेला ‘तो’ अखेरचा सल्ला अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || रावेत : येथील ओजस्वी सोसायटीमध्ये दिनांक २६ जानेवारी रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या आवारात राष्ट्रीय ध्वजवंदन करून संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील मान्यवर डॉक्टर, वकील, शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांना ध्वजवंदनाचा मान देण्यात येतो. यावर्षीचा कार्यक्रम विशेष ठरला तो संरक्षण दलातील माजी सैनिकांच्या उपस्थितीमुळे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक व संरक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये श्री. पुष्करसिंग अमरसिंग जाधव (नाईक, मराठा लाइट इन्फेंट्री), सुभेदार श्री. विनायक भाऊराव महाजन आणि श्री. अनिलदत्त सोनार साहेब यांचा…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी-चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन रामदास जमदाडे यांच्या निवासस्थानी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती समजताच नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी लगेचच महानगरपालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांची…

Read More

|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी- चिंचवड : वालेकरवाडी येथील लक्ष्मीनगर परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास घरगुती आगीची घटना घडली. सचिन जमदाडे यांचे वडील रामदास जमदाडे यांच्या घरी फ्रीजच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती समजताच नगरसेविका पल्लवीताई सुधीर वाल्हेकर यांनी घटनास्थळी भेट देत जमदाडे कुटुंबीयांची विचारपूस केली. “ काळजी करू नका,…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये शुभम वाल्हेकर यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळताना दिसत आहे. मित्रपरिवार, स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने प्रभागात त्यांच्या प्रचाराचे वातावरण सकारात्मक बनले आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, शिवनगरी, बिजलीनगर, गिरिराज, प्रेमलोक पार्क व दळवीनगर या परिसरांमध्ये शुभम वाल्हेकर यांचा जनसंपर्क वाढताना दिसत आहे. घराघरांतून संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेण्यावर भर देण्यात येत असून, तरुण वर्गासह ज्येष्ठ नागरिकांचाही प्रचाराला सक्रीय सहभाग आहे. मित्रपरिवाराच्या माध्यमातून राबवण्यात येणारे प्रचार सत्र, बैठका आणि प्रत्यक्ष भेटीमुळे प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. प्रभागातील नागरी समस्या, पायाभूत…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड :  प्रभाग क्रमांक १७ मधील निवडणूक यंदा केवळ राजकीय लढत न राहता, उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर केंद्रित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शुभम दिलीप वाल्हेकर हे या प्रभागातून निवडणूक लढवत असून, यापूर्वी अनेक काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यरत असतानाही ऐनवेळी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या उमेदवाराला डावलून आयात उमेदवाराला तिकीट देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुभम वाल्हेकर यांच्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे.…

Read More

चिंचवड : पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी येथे स्थानिक उमेदवारीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. जयश्री सुनील सोनवणे आणि पक्षाचे पदाधिकारी सुनील किसन सोनवणे यांनाच उमेदवारी द्यावी, तसेच बाहेरचा उमेदवार देऊ नये, अशी ठाम व एकवटलेली मागणी प्रभागातील महिलांनी केली आहे. या मागणीसंदर्भात वाल्हेकरवाडीतील महिलांनी उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Nana Kate यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटीत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, महिला सुरक्षितता तसेच मूलभूत नागरी सुविधांचे गंभीर प्रश्न मांडण्यात आले. रोजच्या अडचणी अनुभवणाऱ्या आणि कायम नागरिकांच्या संपर्कात असलेल्या स्थानिक नेतृत्वालाच…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी-चिंचवड :  पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने निर्णायक आघाडी घेतली असून, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये विविध पक्षांतील मातब्बर, अनुभवी आणि जनाधार असलेल्या नेत्यांचा जम्बो प्रवेश झाला आहे. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून विरोधी पक्षांच्या गटात खळबळ उडाली आहे. भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि मेट्रोपॉलिटन सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विकासावर विश्वास ठेवत शहराच्या प्रगतीत सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी स्पष्ट झाले. हा प्रवेश म्हणजे केवळ पक्षांतर नसून शहर विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे…

Read More