Close Menu
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
    • सातारा – सांगली – कोल्हापूर
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

August 15, 2026

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
shauryavartanews.in
Subscribe To Youtube Channel Login
shauryavartanews.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • मुळशी
  • मावळ
  • शिरूर
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • सामाजिक
  • उद्योग – व्यापार
  • आरोग्य
  • कृषी
  • शैक्षणिक
  • कला
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
पिंपरी चिंचवड

हिंजवडीत सोनसाखळी चोर पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी.

shauryavartanews2025@gmail.comBy shauryavartanews2025@gmail.comMarch 20, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पिंपरी-चिंचवड : हिंजवडी परिसरात पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांचा पर्दाफाश करण्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त करण्यात आले आहे.

दिनांक ७ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून घेतले. यावेळी महिलेला ढकलून जखमी करण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान ओमकार राजेश चनसोडे (वय २३, रा. घुले वस्ती, मांजरी, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार विशाल विलास काळे याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.

अटक आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले असून पुढील तपासात अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली व सारंग आवाड, तसेच पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हृषिकेश घाडगे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

हिंजवडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, गुन्हेगारांवर पोलिसांची कडक नजर असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमनपावर वाढता आर्थिक बोजा; बाह्य कन्सल्टन्सींवर अवलंबित्व थांबवा – नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे यांचे महापौरांना निवेदन.
Next Article वाल्हेकरवाडी रोड येथे डीपीला भीषण आग; वीजपुरवठा खंडित, नगरसेवक शेखर आण्णा चिंचवडे यांचे तातडीने निर्देश.
shauryavartanews2025@gmail.com
  • Website

Related Posts

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

प्रेमप्रकरणातून हिंजवडीत तरुणाचा खून; पळून जाणारा आरोपी उरुळीकांचन पोलिसांच्या नाकाबंदीत जेरबंद.

August 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
Don't Miss
पुणे

अमरजी पुणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; संजीवनी विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात.

By shauryavartanews2025@gmail.comAugust 15, 20260

हडपसर : संजीवनी मतिमंद मुला-मुलींची शाळा, हडपसर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला…

आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत मातृ विद्यालयाचा उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

August 13, 2026

सहा महिन्यांपासून फरार मोक्का गुन्ह्यातील आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

नऊ महिन्यांपासून फरार खुनाच्या प्रयत्नातील पाहिजे आरोपी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात.

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

आमच्या विषयी

"शौर्य वार्ता न्यूज पोर्टल हा विश्वासार्ह आणि सखोल माहितीचा स्त्रोत आहे. समाजातील विविध विषयांवरील ताजी व अचूक बातम्या, सविस्तर विश्लेषण, आणि वाचकांसाठी संवादात्मक सामग्री यामुळे हे पोर्टल वाचकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. आपल्या देशाच्या शौर्याची प्रेरणा देणाऱ्या बातम्या सादर करताना, हे पोर्टल सामाजिक-जागरूकता आणि जबाबदारीची जाण ठेवते."

YouTube

दिलीप सोनकांबळे ( संपादक )
शुभम जाधव ( कार्यकारी संपादक )

Our Picks
Facebook X (Twitter) Instagram YouTube Pinterest
Website Design and Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?