- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
देवदर्शनासाठी निघालेल्या ३ ते ४ कुटुंबातील सात भाविकांना २ अज्ञात व्यक्तींनी मिळून लुटलं. तसेच कोयत्याचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे तयार रेखाचित्र आता समोर आले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत एक भंयकर प्रकार घडला. तीन ते चार कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. सध्या आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक पंढरपूरची वाट धरतात. सात भाविक स्वामी चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान, २ अज्ञात आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांना लुटले. भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांनी त्यांच्याकडील महागडे ऐवज लुटले. नंतर…
|| प्रतिनिधी : दिलीप सोनकांबळे || पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या सेक्टर २९ मधील जागेवर अनधिकृतपणे कार्यालय बांधल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आरोप हेतुपुरस्सर राजकीय सूडातून करण्यात आल्याचा ठपका खुद्द भोंडवे यांनी ठेवला आहे. “जागा दोन एकर नव्हे, एक एकरच” भोंडवे म्हणाले, “जागा दोन एकर असल्याचे सांगितले जात आहे, प्रत्यक्षात ती केवळ एक एकर आहे. प्राधिकरणाकडून महानगरपालिकेला जागा हस्तांतरित झाली होती. जागेवर पंधरा फूट खोल खड्डे होते. नागरिकांच्या वर्गणीतून ते भरले. बजेट नसल्यानेच आम्ही स्वतः पुढाकार घेतला.” “हे माझे ऑफिस नाही” “हे कार्यालय…
प्रतिनिधी : शुभम जाधव पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती, महाकवी कालिदास दिन आणि जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पवित्र नवकार महामंत्राने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन व शाहू महाराज तसेच महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी…
देहूरोड : दि. २५ जून २०२५ रोजी तळवडे येथील बांधकाम सुरू असलेल्या कंपनीच्या मागील बाजूस एका पुरुष आणि एका महिलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देहूरोड पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर मृतदेह बांधकामस्थळाजवळ अंदाजे १५ फूट अंतरावर ऊताण्या स्थितीत आढळून आले असून, दोघांच्या तोंडावर, हातावर व पायावर दगडाने ठेचल्याच्या गंभीर जखमा आढळल्या आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे, सदर घटना ही अनैतिक संबंधातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, खुनाच्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वानपथकाची मदत घेण्यात आली आहे.…
प्रतिनिधी : अमोल बेडके पिंपरी चिंचवड : दि. २४ जून २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शिताफीने सापळा रचून एक मोठी कामगिरी केली आहे. खून व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेला एक कुख्यात आरोपी देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगताना वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे अटक करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार देवा राऊत व जयवंत राऊत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विशाल सुनिल काळे (वय २९, रा. ढोरआळी, शिरूर, जि. पुणे) हा शस्त्रासह हॉटेल रानमळा जवळ फिरत आहे. विशाल काळे हा शिरूर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. 514/2016, भादंवि…
जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकड्याच्या १२ फूट खोल दरीत चाळीस वर्षीय तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोघेही बेपत्ता होते आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्तींची ओळख रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी पटली आहे. जुन्नर पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने प्रतिकूल परिस्थितीत हे मृतदेह दरीतून बाहेर काढले. नेमकं काय घडलं ? रामचंद्र पारधी हे मूळचे दुर्गावाडीचे असून, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते…
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 91 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चांदणी शक्ती कांबळे (वय ३२ , रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर ), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर), बबीता सुरज उपाध्ये (वय. ५७, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर), पुजा धिरज कांबळे (वय. ३५ ,…
लातूर : रस्त्यावर ट्रिपल सीटने प्रवास करणाऱ्या तीन तरुणींना ‘झिपरे’ असे म्हणत शिवीगाळ करून कानफटात मारणं एका महिला ट्रॅफिक पोलिसावर महागात आलं आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणींनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत महिला पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना लातूर शहरातील असून, आरोपी वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रणिता मुसने या ड्युटीवर जात असताना त्यांनी स्कुटीवरून ट्रिपल सीट जात असलेल्या तीन तरुणींना रस्त्यात थांबवत अश्लील भाषेत शिवीगाळ केली व एका मुलीला कानफटात मारली. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ एका नागरीकाने शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. पाहता पाहता तो व्हायरल झाला आणि वादाला तोंड…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : २१ जून २०२५ रोजी ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवडे लॉन्स येथे एक भव्य योग साधना व योगाभ्यास प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी सकाळी लवकर उठून या योग शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. योगप्रकार, प्राणायाम आणि ध्यान यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. या विशेष शिबिरात राज्यसभेचे मा, खासदार अमरजी साबळे, चिंचवडच्या मा ,आमदार सौ. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, तसेच चिंचवड व वाल्हेकरवाडी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन योगपीठ, हरिद्वार व…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : चिंचवड गावातील शांतिबन सोसायटीत गुरुवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. पूर्वी सोसायटीत हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या व्यक्तीने सोसायटीच्या मुख्य गेटवर ड्युटीवर असलेल्या वॉचमनवर चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर आरोपीने सिमेंटचा गट्टू देखील वॉचमनच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, चिंचवड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जून २०२५ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास शांतिबन सोसायटी, चिंचवडगाव, पुणे येथे घडली. या प्रकरणी सुदाम नारायण कामिटे (वय ५६ वर्षे, व्यवसाय – सिक्युरिटी गार्ड, रा. जय गणेश कॉलनी, चिंचवडे…