Author: shauryavartanews2025@gmail.com

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पुणे :  राजकारण हे भावनांचं, आकांक्षांचं आणि जनतेच्या अपेक्षांचं मैदान असतं. या मैदानात प्रत्येक उमेदवाराला आपली बाजू प्रभावीपणे मांडायची असते – आणि हे शक्य होतं रणनीती, नियोजन आणि तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून. हाच विश्वास घेऊन गेली १४ वर्षं प्रचार क्षेत्रात आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारी संस्था म्हणजे LEIDTECH (चाणक्य नीति). “गल्ली ते दिल्ली” – म्हणजे कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंतचा प्रवास, तोही जिंकण्याच्या संकल्पाने. LEIDTECH च्या योजनाबद्ध प्रचारसाहित्य, रणनीतीपूर्ण सर्व्हेक्षण, मतदारांशी थेट संपर्क, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर यामुळे अनेक उमेदवारांनी निवडणुकीत यशस्वी झेंडा रोवला आहे. 🧠 चाणक्य नीति – प्रचाराची शास्त्रशुद्ध दिशा: LEIDTECH ही केवळ एक प्रचार…

Read More

|| प्रतिनिधी :  अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : निगडी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी श्री खंडोबा मंदिर चौक या सेवा रस्त्यावर मोठमोठाले जीवघेणे खड्डे पडले असून, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमित जाधव सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा काटे यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटो गेटजवळ तीव्र घंटा नाद आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून, रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल संताप व्यक्त केला. हे आंदोलन पिंपरी चिंचवड शहरात लक्षवेधी ठरले आहे. यावेळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ननावरे यांना निवेदन…

Read More

|| प्रतिनिधी – प्रशांत शाहा || गडचिरोली  : चामोर्शी शहरातील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याने शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. या प्रकारामुळे महाविद्यालयीन वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे. अनिकेत गजेंद्र सोनटक्के (वय २४, रा. आरमोरी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो पदवी पूर्ण करण्यासाठी या खाजगी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या प्रकरणात तुषार भांडारकर व पवन दुधबावरे या दोन शिक्षकांचे नाव समोर आले असून, त्यांनी अनिकेत याला सातत्याने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर सतत अभ्यासासंबंधी अमानवी दबाव आणणे,…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||  पुणे : शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यात पुणे (Pune) तिथं काय उणे असं म्हणतात. मात्र, गेल्या काही महिन्यात पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी पाहता पुणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, एका 28 ते 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं. मात्र, या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारिरीक संबंधात होते. मात्र, त्या दिवशी मुलीची इच्छा…

Read More

|| प्रतिनिधी : क्षितिजा देव || पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली होती. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अभियंता महिलेवर कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केलेल्या नराधमाने बलात्कार केला. आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी फोटो काढून ‘मी परत येईन’, असा मेसेज केला होता. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट येत असून 48 तासानंतर पोलिसांच्या 20 पथकाने आरोपी कुरियर बॉयचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत. कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये आरोपीने सुरुवातीला आपण कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर पीडित महिलेच्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर…

Read More

(प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे) पंढरपूर :  भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या दिशेने शिर्डीहून पायी निघालेला विश्वसंत सद्गुरू साईबाबा पालखी सोहळा आता पंढरपूरच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आपल्या सावळ्या विठ्ठलाला भेटण्यासाठी व मनातील श्रद्धा व भक्ती व्यक्त करण्यासाठी हजारो भाविक विंचू, वीस–पंचवीस दिवसांचा प्रदीर्घ पायी प्रवास करत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. साईबाबा पालखी सोहळ्याचे हे सलग 19 वे वर्ष असून, श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंदजी महाराज परमहंस, संस्थापक अध्यक्ष साईबाबा पालखी सोहळा, शिर्डी यांच्या आशीर्वादाने हा भक्तीमय सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने पुढे सरकत आहे. तन, मन, धनाची पर्वा न करता आपल्या विठ्ठलमाऊलीच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा…

Read More

पुणे :  नेपाळ येथून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या नेपाळी गुरखा म्हणजेच साथी चे बोधेगाव बालमटाकळी गावात गावकऱ्यांना रात्री चोरा पासून इतर येणाऱ्या संकटापासून सावध करण्यासाठी रात्रभर शिट्टी व काठी वाजवून गस्त घालणाऱ्या साथी (गुरखा) चे…. दि२४/६/२०२४ रोजी बोधेगाव व बालमटाकळी या गावातील काही बडेबाप की औलादीने नाहक किरकोळ कारणावरून ह्या गुरखा साथीवर जिवघेणा हल्ला केला नव्हे जिवे मारण्याचा प्रयत्न केला.. काही पुढाऱ्यांनी झालेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला व करत आहेत. परंतु माणुसकी नावाची गोष्ट जिंवत आहे की नाही.. त्यांना जरी वाटत असले प्रकरण दबले आहे सर्व शांत झाले आहे परंतु जगात न्याय नावाची गोष्ट जिंवत आहे. *कानुन के हात बडे…

Read More

चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावात अजूनही कोणत्याही बँक शाखेचा अभाव असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेगडी हे गाव परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून येथे शासकीय आश्रम शाळा, पोलिस स्टेशन आणि अनेक शासकीय तसेच खाजगी संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रेगडी गावाच्या सेवाक्षेत्रात सुमारे तेरा ते चौदा गावे येतात. मागील तीन-चार वर्षांपूर्वी रेगडी येथे जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक मंजूर करण्यात आली होती, मात्र अद्याप शाखेची प्रत्यक्ष स्थापना झालेली नाही. या बँक शाखेच्या अभावी शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यवहारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असून वेळ व पैशाची नाहक खर्ची पडत…

Read More

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात 27 जून 2025 रोजी रात्री एका महिला किर्तनकाराची आश्रमात घुसून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. ह.भ.प संगीताताई पवार असं महिला किर्तनकाराचं नाव होतं. याच हत्ये प्रकरणी आता पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या दोन नराधमांना आता पोलिसांनी अटक केली आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला होता. ज्यानंतर पोलिसांना काही ठोस पुरावे गोळा करत आरोपीचा शोध सुरू केला होता. नेमके कसे सापडले आरोपी ? याच हत्येप्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत आज (2 जुलै) हत्येतील दोन आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी…

Read More

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बहिणीने यापूर्वी अनेकदा पंढरपूरची वारी केली आहे. मीही यंदा वारीत जाईन, असा हट्ट धरणाऱ्या एका वीसवर्षीय युवकाने संत तुकाराम महाराज पालखीत सहभागही घेतला. रोजच्या भजन-कीर्तनात उत्साहाने सहभाग घ्यायचा. रात्री उशिरापर्यंत सर्वासमोर नाचायचा. अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्या उत्साही अन् चपळ युवकाचा अंत झाला. विशेष म्हणजे, त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याची आजी एकच टाहो फोडला. टाहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले. त्यांचेही डोळे पाणावले. कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच…

Read More