Author: shauryavartanews2025@gmail.com

पंढरपूर (प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे): श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गैरकारभारावर महाराष्ट्रभरातून होणाऱ्या टीकेला आता पंढरपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनीही सुरात सूर मिसळत थेट श्रीविठ्ठलाच्या चरणी साकडे घातले आहे. मंदिर प्रशासनाविरोधात अंकुशराव यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आवाज उठवत विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे – दर्शन रांगेतील भाविकांना होणारी मारहाण, सुरक्षा रक्षकांची मुजोरी, व्हीआयपी दर्शनावरील वाद, गोशाळेतील गोमाता आणि गोवंशाच्या सुरक्षेचा प्रश्न, स्वच्छतेच्या टेंडरमधील कथित घोटाळे, तसेच मंदिर संवर्धनाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात होणारी गळती आदी बाबींवरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधीही त्यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर वारंवार लक्ष…

Read More

चिंचवड : प्रतिनिधी : ( अमोल बेडके ) श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५ रोजी दीप अमावस्येच्या निमित्ताने “दीप पूजन” व पारंपरिक आणि आधुनिक दिव्यांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र पठण, श्लोक व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पवित्र वातावरणात दिव्यांची आरती देखील करण्यात आली. या विशेष कार्यक्रमासाठी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी श्री अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. 🪔 “चंद्र प्रकाशाची शीतल छाया,                                         …

Read More

निगडी | प्रतिनिधी : ( शुभम जाधव ) पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असतानाच निगडी प्राधिकरणातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दि. १९ जुलै २०२५ रोजी रात्री ८.५५ ते १०.३० वाजताच्या सुमारास, प्लॉट नं. १८, सेक्टर नं. २७, निगडी प्राधिकरण, पुणे येथे राहणाऱ्या चंद्रभान छोटेराम अगरवाल (वय ७६) या ज्येष्ठ नागरिकाच्या घरात ४ अनोळखी पुरुष व १ महिला यांनी सशस्त्रपणे प्रवेश करत लुटमार केली. सदर आरोपींनी फिर्यादी हे घरात टीव्ही पाहत असताना त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून “तिजोरी किधर रखा है?” असा दम दिला. फिर्यादींनी “घरात तिजोरी नाही” असे सांगितले असतानाच आरोपींनी त्यांना मागील खोलीत नेऊन…

Read More

पंढरपूर : प्रतिनिधी ( ज्योतिराम कांबळे ) तीर्थक्षेत्र पंढरपूरात दरवर्षी राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येत असतात. येथील धार्मिक परंपरेनुसार अनेक भाविक प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतात. मात्र, नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुर्दैवी घटना घडत असून भाविकांचे जीव गमावण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी चंद्रभागा नदी पात्रात प्रशिक्षित व अनुभवी कायमस्वरूपी जीवनरक्षक (लाईफ गार्ड) नेमण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अशा उपाययोजनेमुळे भाविकांचा जीवितधोक्याचा प्रश्न सुटेल व भविष्यातील संभाव्य दुर्घटनांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी…

Read More

📍 पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : ( अमोल बेडके ) पोलिस दलावर नागरिकांचा विश्वास असतो, मात्र पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील रावेत पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी हा विश्वास तुडवून लाजीरवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका गुन्ह्याच्या तपासात आरोपीस मदत करण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या महिला पोलीस हवालदार आणि सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे राजश्री घोडे (महिला पोलीस हवालदार) आणि राकेश पालांडे (सहायक फौजदार) अशी आहेत. तक्रारदार हे वकिली व्यवसाय करणारे असून त्यांच्या आशिलावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास राजश्री घोडे करत होत्या. आरोपीस अटक…

Read More

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी –अमोल बेडके | श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये, संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शिक्षणमहर्षी शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन १५ जुलै २०२५ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमापूजनाने झाली. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ‘नवकार महामंत्र’ व ‘ओम नमः शिवाय’ जप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती . ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी), प्रा. श्री अनिलकुमार कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी), कार्यकारिणी सदस्य प्रकाशजी बंब, तसेच…

Read More

पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी : प्रभू कांगाणे ) पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील ४५ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या काळाखडक झोपडपट्टीतील सुमारे ४६ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील ९६ झोपड्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे. वाकड येथील रस्ता रुंदीकरणातील अनधिकृत झोपड्या, टपऱ्या, दुकाने व वीट बांधकामे निष्कासित करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आज काळाखडक झोपडपट्टीतील २५० मीटर लांबीच्या व १६ मीटर रुंदीच्या क्षेत्रावर असणाऱ्या ९६ झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त…

Read More

पिंपरी ( प्रतिनिधी : प्रभू कांगणे ) : गुन्हे शाखा, युनिट-५ पिंपरी चिंचवड यांनी अवघ्या आठ दिवसांत घरफोडी प्रकरणातील चार अट्टल चोरांना अटक करत तब्बल २५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे ३५.६ तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी जप्त केली आहे. या कारवाईमुळे पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे. शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील गु. रजि. नं. १९०/२०२५, भादंवि कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि श्रीधर भोसले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास पुढे नेत अल्टो कार (MH 12 CD 2165)…

Read More

चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चिंचवड येथे आज गुरुपौर्णिमा आणि चातुर्मास प्रारंभ यांचा दुग्धशर्कर योगाने उत्सवमय वातावरणात संयुक्त आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या मातांचे पाद्यपूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्व शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरु-शिष्य जोड्यांच्या माध्यमातून भारतीय परंपरेचा गौरव करण्यात आला. “गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या आठवणीने मन नम्र करणारा असतो. गुरू म्हणजे मार्गदर्शक – आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीप. या दिवशी मातृ पूजन करून आईचाही सन्मान केला जातो. कारण आई…

Read More

चिंचवड (प्रतिनिधी : प्रभु कांगने ) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिर व शिशुविहार विभाग यांचा पालखी सोहळा मंगळवार दिनांक ०५ जुलै २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या नादात आणि वारकरी-साधुसंतांच्या पारंपरिक वेषभूषेत शाळेच्या प्रांगणात दिंडी काढली. अभंग, भजने आणि भक्तिगीते गात त्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी सौ. ज्ञानेश्वरी मोहिते (गायिका), मा. श्री. विकास महाराज गोडसे (पखवाज वादक), आणि चि. हरिदास मोहिते यांनी सुरेल भावगीत सादर करून कार्यक्रमाची शान वाढवली. कार्यक्रम यशस्वी…

Read More