Author: shauryavartanews2025@gmail.com

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : क्षितिजा देव ): गणेशोत्सवानंतर गौरीचे मंगल आगमन झाले. घराघरांत देवीचे आगमन होऊन वातावरण भक्तिभावाने उजळते, तसेच निसर्गालाही आपली देवी-देवता मानून जपले पाहिजे, या संदेशाने स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठान आणि अंघोळीची गोळी संस्था यांच्या वतीने ‘खिळेमुक्त झाडं’ हा उपक्रम राबविण्यात आला. प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे महिलांनी एकत्र येऊन झाडांवर ठोकलेले खिळे व स्टेपलर पिन काढल्या. एकूण २० झाडांना खिळेमुक्त करून तब्बल ५० पेक्षा अधिक खिळे व पिना काढण्यात आल्या. झाडांची साफसफाई करून महिलांनी त्यांच्या पायाशी नैवेद्य ठेवला, पूजा केली आणि आरतीही म्हटली. त्यामुळे परिसर भक्तिभाव, श्रद्धा आणि निसर्गप्रेमाने उजळून निघाला. संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जगताप म्हणाल्या, “झाडांनाही जीव असतो.…

Read More

|| प्रतिनिधि : आशुतोष कातवरे || पिंपरी-चिंचवड – पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत देहूरोड परिसरात रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जड वाहनांना बंदी असतानाही हा अपघात घडला. डंपर चालक मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव दीपाल बहादूर साई (वय ३२, रा. विकासनगर, देहूरोड) असे आहे. अपघातानंतर डंपर चालक प्रदीप मयूर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास (९.३० वाजता) किवळे येथील सईद द्वारका हौसिंग सोसायटीसमोर ही दुर्घटना घडली. दीपाल बहादूर साई हा खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत…

Read More

|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : गुन्हे शाखा, युनिट-४ पिंपरी चिंचवड पोलिसांनी धाडसी कारवाई करत बाबा शेख गॅगचा सदस्य, मोक्का जेल रिलिज व तडीपार आरोपी पवन देवेंद्र बनेटी (वय २४, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव, पुणे) याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी १३ ऑगस्टपासून ‘अवैध अग्नीशस्त्र विरोधी ड्राईव्ह’ सुरू करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखांना दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने ही…

Read More

|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने यंदा “स्वच्छ-सुंदर हरित पंढरपूर” या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून, पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट, ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण, पारंपरिक वाद्यांचा वापर, सामाजिक उपक्रम, प्लास्टिकमुक्त जनजागृती, डस्टबिनचा वापर तसेच वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता या महत्त्वाच्या निकषांवर आधारित असणार आहे. त्यामुळे शहरात गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण व स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती होणार आहे. आकर्षक बक्षिसे या स्पर्धेत विजेत्या मंडळांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. प्रथम…

Read More

|| प्रतिनिधी : प्रशांत शाहा || गडचिरोली मूल : २७ ऑगस्ट मूलपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील आकापूर लगतच्या राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीत बुधवारी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन सहा युवक गंभीर जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की परिसर हादरून गेला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. मूल येथील  एच.पी. गॅस सिलेंडर विक्रेता ‘संजय फ्लेम एजन्सी’ चे गोडाऊन औद्योगिक वसाहतीत असून, डिलिव्हरी बॉय सिलेंडर वाहून नेण्यासाठी वाहनात चढवित असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई (२०), श्रीराम भगीरथ बिश्नोई (२३), कैलास भगीरथ बिश्नोई (२७), रमेश मोहनराम बिश्नोई (१९), महिंद्र रामरख…

Read More

 || प्रतिनिधी : प्रशांत बिट्टुरवार || चंद्रपूर : गणेश चतुर्थीच्या पावन दिनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे मंगल आगमन झाले. यंदा या घरातील गणेशोत्सवाला तब्बल ९५ वर्षे पूर्ण होत असून, १९३० पासून सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने जोपासली जात आहे. जोरगेवार कुटुंबाची ही धार्मिक परंपरा आता चौथ्या पिढीकडे पोहोचली आहे. सकाळच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीत गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शास्त्रोक्त विधी-विधानानुसार झालेल्या पूजा-अर्चा आणि आरतीमुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी शेतकऱ्यांना भरपूर पिके, चांगले उत्पन्न, निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे, अशी प्रार्थना केली. तसेच सर्व नागरिकांच्या…

Read More

पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी : संजय वाईकर ) वाहनचोरीच्या गुन्ह्यांनी हैराण झालेल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परि-०१ वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने धडक कारवाई करत सराईत चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केले आहे. आरोपी मुबीन नुरमुहमद शेख (२५), फईज फिरोज शेख (२२), अगन प्रेगचंद शुक्ला (१९), सुनिल शांताराम मोरे (३०) यांच्या ताब्यातून ₹७,२४,९०० किंमतीच्या १८ मोटार सायकली व २ ऑटो रिक्षा जप्त करून तब्बल २० गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. परि-०१ विशेष पथकाने चोरीच्या घटनास्थळांचा तपास, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर या टोळीला जेरबंद…

Read More

पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी – प्रभू कांगणे ) मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धडक कारवाई करत सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. या आरोपीकडून दोन देशी बनावटीची पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गणेश सावंत व विनोद वीर यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि ही कारवाई करण्यात आली. आरोपीचे नाव ऋषीकेश अर्जुन माळी (वय 22, रा. महाळुंगे) असे असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. २४ ऑगस्ट रोजी पथकाने आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. त्यानंतर पुढील तपासात २५…

Read More

पिंपरी प्रतिनिधी : ( आशुतोष कातवरे ) दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी निगडी पोलीस स्टेशन हद्दीत चैन स्नॅचिंगची घटना घडली. या घटनेनंतर मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ २ यांनी तातडीने फुटेज झोन टू ऑफिसर तसेच बीट मार्शल ग्रुपवर प्रसारित करून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. देहूरोड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडवाल चौक व के-टाऊन येथे पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. रात्री साडेआठच्या सुमारास लाल-काळ्या रंगाची टू ट्वेंटी पल्सर मोटरसायकलवरून संशयित इसम जात असल्याचे दिसताच बीट मार्शल पाटील, वाकडे, खेडकर, माळी आणि भदाणे यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न फोल ठरला…

Read More

पिंपरी चिंचवड : (प्रतिनिधी : शुभम जाधव ) पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने धाडसी कारवाई करत २४ गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार गणेश उर्फे “मॅड गण्या” कांबळे (वय २४, रा. भाटनगर, पिंपरी) याला जेरबंद केले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व धारदार शिकारी चाकू जप्त करण्यात आले. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व पोलिस हवालदार देवा राऊत यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक सराईत गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून निराधारनगर परिसरात फिरत आहे. माहिती खात्रीशीर असल्याचे दिसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना करण्यात आले. निराधारनगर परिसरात पोलिसांनी सापळा रचला असता, आरोपी गणेश उर्फे…

Read More