Author: shauryavartanews2025@gmail.com

प्रतिनिधी:संजय वाईकर पुणे : पुण्याच्या रस्ते वाहतुकीचे तिन तेरा वाजले आहे. कधी कुठल्या मार्गावर अपघात घडेल याचा नेम नाही. अशातच हिंजवडीमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या रेडीमिक्स डंपर एका दुचाकीवर पलटी झाला. डंपरखाली सापडल्यामुळे दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या भयानक अपघातात २ विद्यार्थिनींचा चिरडून मृत्यू झाला. या दोन्ही तरुणींचा मृतदेह अक्षरश: फावड्याने गोळा करावा लागला होता. हे दृश्य पाहून उपस्थितीत लोकांच्या काळजात धस्स झालं. हिंजवडीमधील मान रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी झाला होता. डंपर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डंपर पलटी झाला, तेव्हाच डंपरच्या खाली दोन तरुणी आल्या. डंपर अंगावर पडल्यामुळे या दोन्ही तरुणी जागीच ठार झाल्या. प्रांजली महेश यादव (वय २२,…

Read More

उत्तरप्रदेशातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपीला केली अटक, भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या दिले ताब्यात* पिंपरी । अमोल बेडके । कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एकाची कागदपत्रे घेत त्या आधारे शॉप ऍक्ट लायसन्स व उद्यम आधार काढून त्यानंतर, कंपनीच्या नावाची बनावट बिले तयार केली व एक कोटी तीन लाख रुपयांचा जीएसटी न भरता राज्य शासनाची फसवणूक केली. हा प्रकार मोशी येथे घडला होता. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार झाला होता. त्या फरार आरोपीस पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून अटक केली. तर त्याचा साथीदारही फरार होता. तो फरार आरोपीदेखील पोलिसांना शरण आल्याने आता दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

Read More