- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) यांनी 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली यावरुन अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. वैष्णवीने सहा महिन्यांपूर्वी सासरच्यांकडून आपला हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ केल्याची तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. आपल्याला नवरा शशांक हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांच्याकडून मारहाण होत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर आता वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर राजेंद्र हगवणे हे फरार झाले आहेत. तर शशांक हगवणे याला…
आई म्हणजे सर्वस्व असते. जगात आल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत आई आपल्यासोबत असते. आईचं महत्त्वं काय हे ज्याच्या डोक्यावर मायेचं छत्र नसतं त्याच्याहून चांगलं कोणी सांगू शकणार नाही मुलांसाठी आई आपलं सर्वस्व पणाला लावते. पण जेव्हा तीच आई या जगातून जाते आणि मुलं तिच्या दागिन्यांसाठी भांडतात तेव्हा तिच्या आत्म्याला होणाऱ्या वेदना किती असह्य असतील याचा कोणी विचारही करु शकत नाही. राजस्थानात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये कलयुगातील मुलाने दागिन्यांसाठी थेट आईचा अंत्यविधीच रोखला. राजस्थानच्या कटपुतली-बेहरोर जिल्ह्यात एका मुलाने आईच्या चांदीच्या बांगड्या मिळाव्यात यासाठी अंत्यविधी रोखल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल…
सातारा : सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाने एक तासभर जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्याचबरोबर घरे, दुकाने आणि हॉटेलमध्ये पाणी शिरले. दरम्यान, फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय ठार झाली. जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी ११ पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा…
पिंपरी चिंचवड : पुण्यात दिवसाढवळ्या खून, मारामाऱ्या, दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. आता पिंपरी चिंचवडमध्येही गुन्हेगारी वाढल्याचे दिसू लागले आहे. एमआयडीसी भोसरीपोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी ग्रँड हॉटेलसमोर आर्थिक कारणावरून पाच जणांनी मिळून एका व्यक्तीवर कोयत्याने वार करत त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली बर्गे (रा. चिंबळी, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक म्हाळसकर, रोहन म्हाळसकर, प्रसाद म्हाळसकर, अमोल निळे आणि संकेत जैद (सर्व रा. चिंबळी, ता. खेड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड : श्री फत्तेचंद जैन विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा घवघवीत यश मिळवले असून 96.41% सरासरी निकालाची नोंद केली आहे. गुणवत्तेच्या या शर्यतीत आदित्य पवारने 96% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रेयस जाधव 95.80% गुणांसह द्वितीय आणि कृष्णा पवार 94% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिले. या यशामागे संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आहे. आदित्य पवार याचे आई-वडील दोघेही अशिक्षित असून मोलमजुरी करून त्यांनी आपल्या मुलाला शिकवले. शिक्षणाची जाण आणि कष्टांची तयारी या जोरावर आदित्यने हे यश मिळवले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहताना त्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानले. या यशाबद्दल श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे…
पुणे : बाणेर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनीबाणेर भागातील दोन मसाज पार्लरवर छापा टाकून गुन्हे दाखल केले. बाणेरमधील बालेवाडी फाटा भागात ‘वेदा स्पा’मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अहमद अली (२२), तसेच मसाज पार्लर चालवणारी महिला आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली, अशी माहिती बाणेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. बाणेर भागातील ‘२४ थाई स्पा’…
चाकण : चाकण औद्योगिक भागातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रपाळीत कामावर निघालेल्या २७ वर्षीय महिलेला अंधाराचा फायदा घेत एका नराधमाने मारहाण केली. त्यानंतर रस्त्यातून लगतच्या झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि.१४) चाकण लगतच्या मेदनकरवाडी (ता. खेड) येथे घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी काही पथकांच्या मदतीने आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान बुधवारी (दि.१४) रात्री आठच्या सुमारास संशयित म्हणून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकाश सखाराम भागरे (सध्या रा. मेदनकरवाडी चाकण, ता. खेड, मूळ रा. अकोला) असे या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चाकण पोलिस ठाणे हद्दीतील…
|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, गुरसाळे यांच्या वतीने, रामभाऊ गायकवाड (विकास रत्न) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत – बुधवार, 14 मे 2025: सकाळी 10:00 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर सीमारेषेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. सायंकाळी 7:00 वाजता “शंभूराजे पाळणा” या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, 15 मे 2025: सायंकाळी 7:00 वाजता “गरजा महाराष्ट्र माझा” या जनजागृतीपर कार्यक्रमाचा भरगच्च अनुभव…
|| प्रतिनिधी : अमोल बेडके || पिंपरी चिंचवड – चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे ११ मे २०२४ रोजी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणीवर दोन अनोळखी इसमांनी जीवघेणा हल्ला केला. १७ वर्षे ९ महिन्यांच्या मुलीवर तिच्या राहत्या घरासमोर अॅक्टीव्हा गाडीतून येऊन गळा, पाठ आणि हातावर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तत्काळ वाय.सी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२५ भा.दं.वि. कलम १०३, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात रविवारी रात्री साडेनऊ वाजता कोमल भरत जाधव (वय १८) या तरुणीची दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. आरोपी हेल्मेट घालून दुचाकीवर आले होते आणि त्यांनी कोमलवर भररस्त्यात वार करत तिचा जागीच खून केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी कृष्णाई कॉलनी परिसरात फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी त्यावरून तपासाची चक्रे फिरवली आहेत. सध्या अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. कोमल जाधव हिची हत्या नेमकी का करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी…