- Home
- पिंपरी चिंचवड
- मुळशी
- मावळ
- शिरूर
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- गुन्हेगारी
- राजकारण
- सामाजिक
- उद्योग – व्यापार
- आरोग्य
- कृषी
- शैक्षणिक
- कला
- क्रीडा
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: shauryavartanews2025@gmail.com
मुंबई : १७ ऑक्टोबर २०२५ रोजी रमा एकादशी व वसु बारस या पवित्रदिनी मुंबईतील मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक घडामोडी, आगामी निवडणुका, पक्षाची धोरणात्मक दिशा आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षशिस्त, संघटनवृद्धी आणि जनतेशी जोडलेले राहण्यावर मा. उद्धवजी ठाकरे यांनी विशेष भर दिला. या प्रसंगी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने मा. पक्षप्रमुखांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख (पंढरपूर विभाग) तसेच पंढरपूर पंचायत समिती सदस्य श्री…
दसऱ्याच्या निमित्ताने ट्रॅक्टर धुवायला गेले, नियतीनं घात केला, चौघांचा बुडून मृत्यू; घटनेनं छत्रपती संभाजीनगर हळहळलं. छत्रपती संभाजीनगर : दसरा सणानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळूज परिसरातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे. मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले बुडत असल्याचं बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी…
गडचिरोली : अल्पवयीन मतीमंद मुलीला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना बुधवारी(ता.१) कोरची येथे घडली. याप्रकरणी कोरची पोलिसांनी बंडू सहारे(५५) रा.हेटळकसा, ता.कोरची यास अटक केली आहे. बुधवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास बंडू सहारे याने अल्पवयीन मतीमंद मुलीला फूस लावून सायकलवर बसवून नेले. त्यानंतर बांधकाम सुरु असलेल्या एका घरात नेले. ही बाब एका चहाटपरी चालविणाऱ्या महिलेने बघितली. तिने ही बाब फिर्यादीस सांगितली. त्याने रस्त्याने येत असलेल्या दोन परिचित आशा वर्कर्सना सांगितल्यानंतर तिघेही बांधकाम सुरु असलेल्या घरात गेले. तेथे आरोपी बंडू सहारे हा त्या मतीमंद मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला. तिघांनीही पीडित मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मात्र, आरोपी बंडू सहारे…
|| प्रतिनिधी : शुभम जाधव || चिंचवड : चिंचवड परिसरातील नागसेननगर झोपडपट्टीत जुन्या वादातून २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार (दि.२२) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. वैभव भागवत थोरात (वय २५) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव थोरात हा आपल्या खोलीत इतर चार जणांसोबत बसला असताना आरोपी अचानक आत शिरले. आरोपींमध्ये योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींपैकी योगेश गायकवाड आणि वैभव यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होता. त्याच रागातून आरोपींनी वैभववर अचानक कोयत्याने हल्ला…
अहिल्यानगर : ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ है ब्रिदवाक्य घेऊन नागरिकांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या पोलिस यंत्रणेची प्रतिष्ठा पुन्हा एकदा डागाळली आहे. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात हा गुन्हा शून्य क्रमांकानं नोंदवून पुढील कार्यवाहीसाठी पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत केलेल्या धक्कादायक आरोप करत म्हटले आहे की, ‘सन 2023 ते 2024 या कालावधीत दराडे यांनी लग्नाचं आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या कालावधीत मनोर (पालघर) येथील एका फॉर्महाऊसवर तसेच मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील ठिकाणी वारंवार अत्याचार झाल्याचं स्पष्ट…
प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे पंढरपूर : पंढरपूर शहर खड्ड्यांचे साम्राज्य बनले असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे. भीमा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरच गुडघाभर खड्डे पडल्याने वाहतुकीसह अपघातांचा धोका वाढला आहे. शहराची अवस्था इतकी दयनीय आहे की पंढरपूर आहे की “खड्डेपूर” असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. नगरपालिका कुंभकर्णी झोप काढत असून आजी-माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांना फक्त निवडणूक आली कीच पंढरपूरची आठवण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. शहरातील गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य, रस्त्यांवर मोकाट जनावरे, डुकरे, कुत्री व तुंबलेली गटारे यामुळे भाविक आणि नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. विशेष म्हणजे, सरगम चौक, छत्रपती…
पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचा ९८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी निमंत्रित सदस्य श्री. चंद्रकांतजी भन्साळी उपस्थित होते. तसेच पन्नालाल लुंकड वस्तीगृहाचे गृहपती श्री. महावीर जैन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. ज्योती छाजेड यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री.…
|| प्रतिनिधी : संजय वाईकर || पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शुक्रवार (दि. ५) रात्री नाना पेठेतील नवरंग मित्र मंडळाजवळ झालेल्या भीषण हल्ल्यात गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद कोमकर (रा. नाना पेठ) याचा निर्घृण खून करण्यात आला. हल्लेखोरांनी प्रथम पिस्तूलातून सलग तीन गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत त्याला जागीच ठार मारले. गोविंदचा पिता गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे आंदेकर टोळीने बदला घेण्यासाठीच गोविंदला लक्ष्य केले, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे टोळीने…
|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे || पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषद आणि शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” ला पंढरपूरकर नागरिक, महिला भगिनी, गणेश मंडळे व सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, या स्पर्धेत तब्बल 116 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सजावट करणे, टाकाऊ पासून टिकाऊ संकल्पना राबविणे तसेच प्लास्टिक-थर्माकोलमुक्त सजावट या बाबींवर विशेष भर देण्यात आला. स्पर्धकांनी आपल्या कलात्मकतेतून विविध पारंपरिक आणि सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले. यामध्ये माधुरी हत्तीणीची कथा, मराठी सण व परंपरा जपा हा संदेश, पांडुरंग भक्त गोरा कुंभाराचा देखावा, श्री…
|| प्रतिनिधी : ज्योतीराम कांबळे, || पंढरपूर ,भटुंबरे : जय हनुमान गणेश उत्सव तरुण मंडळ भटुंबरे–९९९ यांच्या वतीने यंदाही मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवसांच्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यातील विशेष आकर्षण ठरला ‘होम मिनिस्टर’ हा महिलांसाठीचा उपक्रम. गावातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत स्पर्धेला रंगत आणली. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. विजेते पुढीलप्रमाणे : प्रथम : कल्पना संगीत – पैठणी द्वितीय : तेजल घोगरे – सोन्याची नथ तृतीय : अश्विनी परचंडे – शेगडी चतुर्थ : वर्षा गुटाळा – टेबल फॅन पाचवा : नीलम वाघमारे – किचन डबा याशिवायही अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे…