पिंपरी चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचा ९८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्रा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारिणी निमंत्रित सदस्य श्री. चंद्रकांतजी भन्साळी उपस्थित होते. तसेच पन्नालाल लुंकड वस्तीगृहाचे गृहपती श्री. महावीर जैन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. ज्योती छाजेड यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. राजेंद्र पितळीया, श्री. संजीव वाखारे, सौ. मनीषा कलशेट्टी व सौ. मीनाक्षी ताम्हाणे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी अध्यक्षीय भाषणातून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वर्धापन दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली. वर्ग सजावटीचे परीक्षण श्री. शेवाळे सर, श्री. बेलसरे सर, श्री. चोरडिया सर व सौ. गोतरणे मॅडम यांनी केले. सजावट स्पर्धेची थीम “निसर्ग आणि पर्यावरण”, “करिअर संधी व आव्हाने” आणि “संत समाज सुधारक” अशी होती.

तसेच या निमित्ताने इयत्ता सातवी व दहावी वर्ग प्रतिनिधींची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी वर्गशिक्षक व बी.एल.ओ. शिक्षक श्री. सुतार डि.के., सौ. ज्योती राऊत, सौ. स्वाती खोडदे व श्री. आव्हाड एस.टी. यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उत्तम बिर्जे यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. मनीषा कलशेट्टी यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version