पिंपरी-चिंचवड : ( प्रतिनिधी : संजय वाईकर ) वाहनचोरीच्या गुन्ह्यांनी हैराण झालेल्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परि-०१ वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने धडक कारवाई करत सराईत चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केले आहे. आरोपी मुबीन नुरमुहमद शेख (२५), फईज फिरोज शेख (२२), अगन प्रेगचंद शुक्ला (१९), सुनिल शांताराम मोरे (३०) यांच्या ताब्यातून ₹७,२४,९०० किंमतीच्या १८ मोटार सायकली व २ ऑटो रिक्षा जप्त करून तब्बल २० गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त सो. पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. परि-०१ विशेष पथकाने चोरीच्या घटनास्थळांचा तपास, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर या टोळीला जेरबंद करून मोठी उचल करण्यात आली. या कारवाईमुळे पिंपरी, भोसरी, सांगवी, निगडी, दापोडी, वाकड तसेच ठाणे आणि मुंबईतील २० गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

या कारवाईचे मार्गदर्शन – मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड; मा. डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सहआयुक्त; मा. श्री. सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त; मा. श्री. संदिप आटोळे, पोलीस उपायुक्त परि-०१; श्री. सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त पिंपरी विभाग; श्री. अशोक कडलग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली.

सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पो.उप.निरीक्षक किरण बळीप, बेदरकर, तळपे, गेगजे, शिंदे, बजबळकर, ढवळे, मुरे, पिंजरकर, मोघे, जायभाय, जोशी, म्हस्के, कोंडे यांनी केली आहे.

या धडक कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसणार असून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षतेबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version