पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी : अमोल बेडके ) पिंपरी मार्केट येथे भरदिवसा दुकानात घुसून व्यापाऱ्याला गोळी घालून सोन्याची चैन हिसकावणारा आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे करणारा रवी पुजारी टोळीतील कुख्यात आरोपी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाच्या हाती लागला. पोलिसांनी तब्बल ७०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीपर्यंत पोहोचत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, १ ऑगस्ट रोजी दुपारी ओमकार जनरल स्टोअर्स, पिंपरी येथे आरोपीने ‘फ्रुटी’ मागण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न केला. चैन न तुटल्याने आरोपीने पिस्टल दाखवून धमकावत पुन्हा ओढली. यावेळी उर्वरित चैन मिळवण्यासाठी त्याने व्यापाऱ्याच्या पायावर गोळी झाडून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर पोलिस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सह पोलीस आयुक्त मा. श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त गुन्हे मा. डॉ. शिवाजी पवार आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० पथके तयार करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, तसेच पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, मोहसिन आत्तार, अमोल गोरे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, गणेश सांवत, सुमित देवकर, पवन वाजे, समिर रासकर, अमर कदम, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, विनोद वीर, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर कौलगे, गणेश कोकणे, हर्षद कदम आणि औदुबर रोंगे यांनी दिवस-रात्र काम करून तब्बल ७०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले.
तपासात आरोपी रविंद्र भाऊसाहेब धारे (वय ४०, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली, मुळगाव ओझर्डे, ता. मावळ, जि. पुणे) याचा माग काढून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. तो रवी पुजारी व सुरेश पुजारी यांच्या टोळीतील सदस्य असून यापूर्वी नवी मुंबई येथे दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. त्याच्यावर खून, खंडणी, गोळीबार, जबरी चोरी, वाहन चोरी असे २५ गंभीर गुन्हे नोंद आहेत.
आरोपीकडून १० ग्रॅम सोन्याची चैन, एक देशी बनावटीचे पिस्टल, ११ जिवंत काडतुसे व २ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. तसेच चिंचवड, एमआयडीसी भोसरी आणि वडगाव मावळ येथील तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., सह पोलीस आयुक्त मा. श्री. शशिकांत महावरकर सो., अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड सो., पोलीस उपआयुक्त गुन्हे मा. डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, मोहसिन आत्तार, अमोल गोरे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, नितीन उमरजकर, गणेश सांवत, सुमित देवकर, पवन वाजे, समिर रासकर, अमर कदम, गणेश हिंगे, नितीन लोखंडे, विनोद वीर, प्रविण कांबळे, ज्ञानेश्वर कौलगे, गणेश कोकणे, हर्षद कदम, औदुबर रोंगे यांनी केली आहे.
