पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी : प्रभू कांगणे ): भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे व गुन्हे शाखा युनिट ५ यांच्या संयुक्त कारवाईत भोसरीतील औद्योगिक भागात घडलेल्या तब्बल ४० लाख ५० हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही घटना ११ जुलै २०२५ रोजी ब्राईट इंडिया टूल्स नावाच्या दुकानात घडली होती. या दुकानातून ४०,५०,००० रुपये किंमतीचे कार्बाईड टूल्स व ईन्सर्ट मटेरिअल चोरीस गेले होते. या प्रकरणी फिर्यादी बालाजी गौरीशंकर हलकुडे (वय ४०, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून गु.र.नं. ३९६/२०२५ नुसार भा.दं.सं. २०२३ चे कलम ३३१(४), ३०५, ३२४(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट ५ यांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मुंबई आणि उत्तर प्रदेश येथील विविध ठिकाणी शोध घेऊन खालील आरोपींना अटक केली.
१) हुसेनअली शोकतअली सय्यद (वय ४५, रा. संतोषीमाता नगर, सातपूर, जिल्हा नाशिक, मूळ रा. खोराषा, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश),२) सोहेल फकरुद्दीन कुरेशी (वय २५, रा. पिलाहाऊस, रंगीला चाळ, गिरगाव, मुंबई, मूळ रा. सरातरीन, संबळ, मुरादाबाद, उत्तर प्रदेश), ३) असिफ युसुफ खान (वय ३९, रा. नाईक नगर, एल.व्ही.एस. मार्ग, सायन, मुंबई), ४) अजमत अजगर अली (वय ४३, रा. आपा बिल्डिंग, नळ बाजार, भेंडी बाजार, मुंबई, मूळ रा. गोंड, उत्तर प्रदेश)
या आरोपींकडून चोरीस गेलेला ₹४०,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांना पोलीस कोठडी मिळवून पुढील तपास सुरु आहे. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक मन्सुर मणेर हे काम पाहत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) बापू बांगर, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयुक्त (एमआयडीसी विभाग) अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जामदार (एमआयडीसी), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे (गुन्हे शाखा युनिट ५), सपोनि. श्रीधर भोसले, पुपोनि. राजेंद्र पानसरे, पुपोनि. मन्सुर मणेर, पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी, प्रशांत सोरटे, गणेश बोऱ्हाडे, नितीन खेसे, भागपत शेप, आनंद जाधव, अक्षय क्षिरसागर, उमेश सातकर, गजानन आढे, रविंद्र जाधव, युनिट ५ मधील अंमलदार प्रशांत पवार, शामसुंदर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, राजकुमार ईघारे, तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे अंमलदार नागेश माळी, राजू जाधव, प्रकाश ननावरे, पोपट हुलगे, रमेश कारके यांचा समावेश होता.
ही कारवाई कौशल्यपूर्ण नियोजन, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे शक्य झाली असून, भोसरी एमआयडीसी परिसरातील औद्योगिक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
