पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी –अमोल बेडके | श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये, संस्थेचे माजी ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय शिक्षणमहर्षी शंकरलालजी जोगिदासजी मुथा यांचा १६ वा पुण्यस्मरण दिन १५ जुलै २०२५ रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वर्गीय भाऊंच्या प्रतिमापूजनाने झाली. उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकडून ‘नवकार महामंत्र’ व ‘ओम नमः शिवाय’ जप करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती .
ॲड. मा. श्री. राजेंद्रकुमारजी मुथा (ऑनररी जनरल सेक्रेटरी), प्रा. श्री अनिलकुमार कांकरिया (सहाय्यक सेक्रेटरी), कार्यकारिणी सदस्य प्रकाशजी बंब, तसेच असिस्टंट कमिशनर मा. ढाकणे साहेब हे मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले:
इयत्ता ५ वी – ऑरगंडी फुलांची निर्मिती
इयत्ता ६ वी – बॅजेस तयार करणे
इयत्ता ७ वी – फ्लॉवर पॉट डिझाइन
इयत्ता ८ वी – औषधी वनस्पती संग्रह
इयत्ता ९ वी – हिंदी विषयावर प्रदर्शनी
इयत्ता १० वी – विज्ञानातील जादू प्रयोग
या सर्व कार्यशाळा व प्रदर्शनांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या चि. सतेज जगताप व चि. अवधूत हाजगुडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यासोबतच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या मा. सौ. सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका सौ. मनीषा जैन, पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया, श्री संजीव वाखारे, सौ. मनीषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी सौ. सुवर्णा गायकवाड व सौ. ज्योती छाजेड, तसेच शिक्षक श्रीमती अंजू सोनवणे व श्री प्रभात जैन यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री दीपक सुतार, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. मनीषा कलशेट्टी यांनी केले. शेवटी मा. प्राचार्या सौ. सुनीता नवले यांनी अध्यक्षीय भाषणात स्वर्गीय भाऊंच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
