|| प्रतिनिधी : क्षितिजा देव ||

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली होती. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय अभियंता महिलेवर कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश केलेल्या नराधमाने बलात्कार केला.

आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वतःचा सेल्फी फोटो काढून ‘मी परत येईन’, असा मेसेज केला होता. या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट येत असून 48 तासानंतर पोलिसांच्या 20 पथकाने आरोपी कुरियर बॉयचा शोध घेत मुसक्या आवळल्या आहेत.

कोंढवा परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सोसायटीमध्ये आरोपीने सुरुवातीला आपण कुरियर बॉय असल्याचे सांगत सोसायटीमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर पीडित महिलेच्या फ्लॅटवर पोहोचल्यानंतर दरवाज्यात उभा राहून तुमचं कुरिअर आलं असल्याचे सांगितले. महिलेने हे कुरिअर आपले नाही, असा स्पष्ट नकार दिला. तरी देखील आरोपीने सही करावी यासाठी महिलेला जबरदस्ती केली.

पीडित तरुणी घरी एकटी असताना बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता हा सगळा प्रकार घडला. एक अज्ञात व्यक्तीने डिलीव्हरी बॉय आहे, आणि पार्सल द्यायचे आहे असे सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो त्या तरुणीपर्यंत पोहोचला. ते कुरियर आपले नाही असे तिने त्याला सांगितलं. पण तरी ही त्याने तिला सही करण्यास भाग पाडले. त्यासाठी दरवाजा उघडला असता त्याने आत घुसून, पीडित महिलेच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यात ती तरुणी बेशुद्ध झाली. त्याच अवस्थेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर मी पुन्हा येईन, असा मेसेज लिहून तो नराधम पळून गेला होता.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी गांभिर्य लक्षात घेवून तपासाची चक्रे फिरवली. आरोपीचा शोध घेण्यासाठी 20 टीम तयार करण्यात आल्या होत्या. दोन संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले होते.आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यांनी जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. त्यातून पोलिसांच्या हाती एक पुरावा लागला.

आरोपी पीडित तरूणीच्या ओळखीचा ?

या सर्व पुराव्याच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान मुख्य आरोपीला अटक केली. त्याच्या प्राथमिक चौकशीतून हा आरोपी आणि पीडित तरूणी हे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. पण पोलिसांनी याबाबत अजून स्पष्टीकरण दिलेले नाही.

आरोपीची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला पकडण्यासाठी वीस टीम तयार केल्या होत्या. शेवटी सीसीटीव्हीच्या नजरेतून हा आरोपी वाचू शकला नाही. विशेष म्हणजे तो तिला ओळखत होता. आता चौकशीतून तो काय खुलासे करता याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version