पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये नागरिकांचे मोबाईल व महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय व परजिल्हयातील टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 91 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चांदणी शक्ती कांबळे (वय ३२ , रा. मौलानी शाळेजवळ, गांधीनगर, उदगीर ता. उदगीर जि. लातुर ), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमा देवी नगर उदगीर, ता. उदगीर, जि. लातुर), बबीता सुरज उपाध्ये (वय. ५७, रा. चंद्रमा देवी नगर, उदगीर, ता. उदगीर जि. लातुर), पुजा धिरज कांबळे (वय. ३५ , रा. भदाडे चौक, गांधीनगर उदगीर, ता. उदगीर जि. लातुर ), गणेश विलास जाधव (वय. ३० वर्षे, रा. बुशननगर झोपडपट्टी, आण्णासाहेब पाटील शाळेजवळ, सोलापुर मुळ रा. मु. पो. व्यागळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर), अरबाज नौशाद शेख (वय १९, रा. महाराजपुर, थाना तलझारी जि. साहेबगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका 17 वर्षीय विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनाचे दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरीचे व चैन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्हयांना प्रतिबंध होण्याकरीता अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांनी गुन्हे शाखा युनिट ०५ व युनिट ०६ पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांची नेमणुक केली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले यांना चांदणी कांबळे, रिटा कांबळे, बबीता उपाध्ये, पुजा कांबळे व गणेश जाधव यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखविल्या. तेव्हा त्यांच्याकडून सुमारे 19 लाख 41 हजार 310 रुपयांचे २२.५ तोळे वाजणाचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तर हडपसर, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान आरोपी अरबाज शेख व एका विधी संघर्षीत बालकास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये किंमतीचे १४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत. तर आरोपींनी हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक आशा तीन गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली आहे. उर्वरीत मोबाईलच्या मुळ मालकांचा व सोन्याचे दागिन्यांच्या मुळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. पालखी सोहळा दरम्यान ज्या नागरीकांचे मोबाईल हॅण्डसेट किंवा ज्या महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरीस गेलेले आहेत त्यांनी हडपसर व वानवडी ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पुणे शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे युनिट पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे, निलेश साळवे, सुहास डोंगरे, वैशाली इंगळे, ज्योती मुल्का, वैशाली खेडेकर, सारंग दळे, निर्णय लांडे व जावेद शेख यांच्या पथकाने केली आहे.
