|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||
पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे मा. उपाध्यक्ष श्री शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी एक समाजहितकारी उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व आ. भा. (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी करून देण्यात येणार असून, यामार्फत गरजूंना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे.
हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, हा एक सामाजिक बांधिलकीचा आणि लोकसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श आहे.
नोंदणी व माहितीचे ठिकाण:
शेखर अण्णा चिंचवडे जनसंपर्क कार्यालय, अपर्णा कॉलनी, दगडोबा चौक, चिंचवड नगर.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
” शौर्य वार्ता न्यूज ” परिवाराच्या वतीने
मा. श्री शेखर अण्णा चिंचवडे यांना
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि लोकसेवेच्या कार्यात यश लाभो, हीच प्रार्थना !
