|| प्रतिनिधी : प्रभू कांगणे ||
पिंपरी चिंचवड : एका हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मागणी पुर्ण नाही केल्यास तुला व तुझा मालक चंदन सिंग याचा मर्डर करील अशी धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी अडीचच्या सुमारास रावेत येथील म्हस्के वस्ती येथील शौर्य रेसीडेन्सी लॉजिंग हॉटेल येथे घडली.
याप्रकरणी रावेत पोलिसांनी हनुमंत भगवान शिंदे (वय ४०, रा. पारशी चाळ, देहुरोड) आणि प्रेम प्रेमनाथ ठाकुर (वय २०, रा. सिद्धीविनायक मंदिराजवळ, विकासनगर, देहुरोड) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत दिनेश भास्कर मराठे (वय ४१, रा. सिल्हरसिटी, जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे घटनेच्या वेळी आपल्या हॉटेलमध्ये असताना आरोपी तेथे आले. त्यांनी दहशत निर्माण करुन जोर जोरात आरडा-ओरडा व शिवीगाळ करत शस्त्राचा धाक दाखवून २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच मागणी पुर्ण नाही केल्यास फिर्यादीला व मालक चंदन सिंग याचा मर्डर करील अशी धमकी दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुंभार करत आहेत.
