|| प्रतिनिधी : किरण आडागळे ||
देहूरोड : सलग तीन दिवस मुख्य अभियंता महावितरण कार्यालय देहू गैरहजर आणि नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणी नाही. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने वीजपुरवठा संदर्भात अर्ज देण्यासाठी सलग तीन दिवस झाले हेलपाटे मारावे लागत असल्या कारणाने अध्यक्ष्य बापूराव बनसोडे आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्य अभियंता देहू गाव, झोडगे साहेब गैरहजर असल्याने त्यांच्या रिकाम्या खुर्चीला त्यांनी जाऊन केला अर्ज.
ज्येष्ठ नागरीकांना उन्हा तान्हाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.
सततच्या अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांचे विद्युत उपकरण खराब होत आहेत. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच सर्रास दिवसा ढवळ्या वीजचोरी होत आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास या सर्व गोष्टी आणुन देखील अधिकारी झोडगे साहेब हे कोणतीही कारवाई करत नाहीत.
उलट त्यांच्या कडून वेलकडूपणा केला जातो. साधा अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यालयात लिपीक नाही. सलग तीन दिवस हेलपाटे परून त्रस्त झाल्याने ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन देहू गाव यांच्या वतीने रिकाम्या आज त्यांच्या खुर्चीला अर्ज देण्यात दिला.
