|| प्रतिनिधी : आशुतोष कातवरे ||

लोणावळा : अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात व जुगार अड्ड्यावर कारवाई करत केले वेगवेगळे ३ गुन्हे दाखलपु णे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक २२/१/२०२५ रोजी पहाटे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वार्ड लोणावळा येथे इसम नामे ताबान जायर पठाण वय २८ रा जी वार्ड इराणी चाळ हा मेफेड्रॉन पावडर (एम डी) ची ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पंच व पोलीस पथकासह बातमी मिळाले ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे ताबान पठाण याच्या अंगझडतीमध्ये ३.६२ ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर सापडली असून त्याची एकूण किंमत १५०००/- रुपये आहे. त्याबाबत लोणावळा शहर पोलिस स्टेशन ला त्याच्या विरोधात NDPS एक्ट १९८५ चे कलम ८ (क), २१ (४) नुसार गुन्हा दाखल आहे.

दिनांक २६/१/२०२५ रोजी पहाटे श्री सत्यसाई कार्तिक सो सहा पोलीस अधीक्षक यांना गोपनीय रित्या बातमी मिळाली की युनिकॉर्न मोटार सायकल नंबर MH20GT0752 ही वर दोन इसम संभाजीनगर हून मोटार सायकल वर अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी घेऊन मुंबई बाजूकडे जात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने लागलीच पंच व पोलीस पथकासह वरसोली टोलनाक्याजवळ नाकाबंदी लागली असता मिळालेल्या बातमीमधील मोटार सायकल पहाटे ०५:०० वा चे सुमारास मिळून आली

त्यावरील असलेल्या दोन्ही इसमांची नावे १) अक्षय गोपीनाथ जाधव वय २५ (२) प्रल्हाद आसाराम जाधव वय ३४ वर्ष दोन्ही रा आसेगांव या गंगापूर जि संभाजीनगर अशी असून त्यांच्याकडील रॉक (bag) ची झडती घेतली असता त्यामध्ये ६०,५१२/- रुपये किमतीचा १५.१२८ किलो ग्रॅम वजनाचा बिया बोंडासह हिरवट काळसर तपकिरी रंगाचा ओलसर गांजा विक्रीकरिता कोठेतरी घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुरन. २४/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे (NDPS) कलम ८ (क), २० (ब) (ii), BNS ३ (५) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात १ लाख रुपये किमतीची मोटरसायकल व ६०५१२/- रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण १,६०,५१२/- चा एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version