चिंचवड (प्रतिनिधी : प्रभु कांगने ) – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिर व शिशुविहार विभाग यांचा पालखी सोहळा मंगळवार दिनांक ०५ जुलै २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या नादात आणि वारकरी-साधुसंतांच्या पारंपरिक वेषभूषेत शाळेच्या प्रांगणात दिंडी काढली. अभंग, भजने आणि भक्तिगीते गात त्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी मा. श्री. अनिलकुमारजी मोतीलालजी कांकरिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी सौ. ज्ञानेश्वरी मोहिते (गायिका), मा. श्री. विकास महाराज गोडसे (पखवाज वादक), आणि चि. हरिदास मोहिते यांनी सुरेल भावगीत सादर करून कार्यक्रमाची शान वाढवली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री. सचिन परब, सौ. भारती ठाकरे, सौ. कविता वाल्हे, सौ. उषा कदम आणि सौ. रेखा पितलिया यांनी विशेष मेहनत घेतली.

या उपक्रमास संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी मा. अ‍ॅड. राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा आणि सहाय्यक सेक्रेटरी मा. प्रा. अनिलकुमारजी कांकरिया यांचे मार्गदर्शन लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version