चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख असलेल्या रेगडी गावात अजूनही कोणत्याही बँक शाखेचा अभाव असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेगडी हे गाव परिसरातील प्रमुख बाजारपेठ असून येथे शासकीय आश्रम शाळा, पोलिस स्टेशन आणि अनेक शासकीय तसेच खाजगी संस्था कार्यरत आहेत. विशेष म्हणजे रेगडी गावाच्या सेवाक्षेत्रात सुमारे तेरा ते चौदा गावे येतात.

मागील तीन-चार वर्षांपूर्वी रेगडी येथे जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक मंजूर करण्यात आली होती, मात्र अद्याप शाखेची प्रत्यक्ष स्थापना झालेली नाही. या बँक शाखेच्या अभावी शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यवहारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत असून वेळ व पैशाची नाहक खर्ची पडत आहे.

तरी शासन आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेगडी येथे लवकरात लवकर नवीन बँक शाखा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शाहा यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version