देवदर्शनासाठी निघालेल्या ३ ते ४ कुटुंबातील सात भाविकांना २ अज्ञात व्यक्तींनी मिळून लुटलं. तसेच कोयत्याचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत घडली.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे तयार रेखाचित्र आता समोर आले आहे.
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत एक भंयकर प्रकार घडला. तीन ते चार कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. सध्या आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक पंढरपूरची वाट धरतात. सात भाविक स्वामी चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान, २ अज्ञात आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांना लुटले.
भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांनी त्यांच्याकडील महागडे ऐवज लुटले. नंतर एका अल्पवयीन मुलीला कोयत्याचा दाखवत तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
दरम्यान, फरार एका आरोपीचा रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. आरोपीचे रेखाचित्र पुणे ग्रामीण पोलिसांनी जारी केले आहे. पोलिसांनी रेखाचित्र जारी करत, रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना देण्यात यावी. तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
