|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||

चिंचवड : २१ जून २०२५ रोजी ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवडे लॉन्स येथे एक भव्य योग साधना व योगाभ्यास प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी सकाळी लवकर उठून या योग शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. योगप्रकार, प्राणायाम आणि ध्यान यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

या विशेष शिबिरात राज्यसभेचे मा, खासदार अमरजी साबळे, चिंचवडच्या मा ,आमदार सौ. अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, तसेच चिंचवड व वाल्हेकरवाडी परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन योगपीठ, हरिद्वार व भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या प्रेरणेतून करण्यात आले. या शिबिरात सूर्यनमस्कार, अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी, ताडासन, वज्रासन अशा विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षित मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

कार्यक्रमात सहभागी होताना सर्व मान्यवरांनी देखील योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले. योगामुळे मनःशांती, शरीराचे सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य साध्य होते, यावर भर देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून आरोग्यदायी, सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत सर्व सहभागी योगप्रेमींना नित्य योगसाधना अंगीकारण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक भाजप कार्यकर्ते, नगरसेवक व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version