|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गेल्या दहा वर्षांपासून निष्ठेने सेवा देणाऱ्या कामगारांना अचानक कामावर येण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या स्थानावर समितीने आपल्याच मर्जीतील लोकांना कामावर घेतले आहे.
या अन्यायाविरोधात जुन्या कामगारांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार बोंबाबोंब आंदोलन छेडले. “न्याय द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कामगारांच्या भावना व त्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी देखील संतप्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
