📌 शुभेच्छुक : शौर्य वार्ता न्यूज परिवार
{ संपादकीय : दिलीप सोनकांबळे } आपल्या आजूबाजूला अशी काही तरुण मंडळी असतात, ज्यांचं विचारचक्रच वेगळं असतं. अशाच धाडसी, वेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या आणि स्वतःचा स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या व्यक्तिमत्त्वात नाव ठरावं – अरविंद श्रीधर भोंगळे.
कधी बँजोवर संगीताची मैफल रंगवणारा, शिक्षणाच्या प्रवासात नेहमीच नवे वळण घेणारा, आणि आयुष्यात संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करणारा हा तरुण, आज दोन कंपन्यांचा यशस्वी संचालक आहे. कुणाला वाटलं असेल की हा ‘वेडा पोरगा’ वाट चुकला आहे, पण वास्तवात तो आयुष्याचं नवं परिमाण शोधणारा एक कर्तबगार उद्योजक ठरला.
आज अरविंद भोंगळे हे केवळ यशस्वी उद्योजकच नाही, तर शौर्य वार्ता न्यूज चे विभागीय संपादक म्हणून पत्रकारितेतील नवा चेहरा ठरले आहेत. त्यांच्या लेखणीचा झणझणीत आघात आणि निर्भीडता हीच त्यांची ओळख बनली आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नांवर परखडपणे भाष्य करताना अनेकदा सामान्य नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आहे.
तेवढंच नव्हे, तर आग विरहित भारत घडवण्याचा संकल्प त्यांनी घेतला असून, त्यांच्या कंपनीमार्फत शालेय विद्यार्थ्यांना आगीपासून संरक्षणाची प्रशिक्षणे देऊन जनजागृतीचा एक मोठा उपक्रम ते राबवत आहेत. त्यांची सामाजिक जाण, आर्थिक शिस्त, आणि न थकता काम करण्याची जिद्द – ही सर्व युवा पिढीसाठी आदर्श ठरावी अशी आहे.
शौर्य वार्ता न्यूज तर्फे अरविंद श्रीधर भोंगळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या कार्यास अधिक बळ लाभो, पत्रकारितेत नवा मानदंड प्रस्थापित होवो, आणि सामाजिक बांधिलकी अधिक गडद होवो हीच प्रार्थना!
