पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष आणि समाजहिताच्या कार्यात नेहमीच पुढे असलेले लोकनेते शेखर अण्णा बबनराव चिंचवडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी मोफत आयुष्मान भारत योजना कार्ड व ‘आ. भा.’ (आरोग्य भारत) कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तब्बल 500 नागरिकांना मोफत कार्ड देण्यात आली.
हा उपक्रम केवळ एकदिवसीय उत्सव नसून, गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना खूप मोठा आधार ठरते.
उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून, अनेकांनी श्री शेखर अण्णा यांचे आभार मानले. “ही योजना म्हणजे गरजूंना मिळणारे जीवनदान आहे,” असे मत अनेक लाभार्थ्यांनी व्यक्त केले.
श्री शेखर अण्णा चिंचवडे यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “समाजासाठी काहीतरी देण्याची संधी म्हणून मी माझा वाढदिवस साजरा करतो. लोकसेवा हीच माझी खरी ओळख आहे. पुढेही असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे.”
वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपासून दूर जाऊन, जनतेच्या हितासाठी सकारात्मक आणि परिणामकारक कार्य हाच खरा लोकसेवेचा अर्थ आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत श्री शेखर अण्णा यांनी केलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
