|| प्रतिनिधी – ज्योतीराम कांबळे ||
पंढरपूर : सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, गुरसाळे यांच्या वतीने, रामभाऊ गायकवाड (विकास रत्न) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य यांच्या समन्वयातून छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
बुधवार, 14 मे 2025:
सकाळी 10:00 वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येईल. त्यानंतर सीमारेषेवर शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
सायंकाळी 7:00 वाजता “शंभूराजे पाळणा” या भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, 15 मे 2025:
सायंकाळी 7:00 वाजता “गरजा महाराष्ट्र माझा” या जनजागृतीपर कार्यक्रमाचा भरगच्च अनुभव उपस्थितांनासायंकाळी 7:00 वाजता “क्रांतिसिंह नाना पाटील विचार मंच, गुरसाळे” येथे समारोपाचा कार्यक्रम पार पडेल.
या तीन दिवसांच्या कार्यक्रमात शौर्य, देशप्रेम आणि सामाजिक जागृती यांचे उत्कृष्ट दर्शन घडणार असून, शंभूराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या आयोजनातून केला जाणार आहे.
आयोजक: रामभाऊ गायकवाड (विकास रत्न), समन्वयक – मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य
