|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकर वाडी येथील कृष्णाई कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 18 वर्षांच्या तरुणीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, सध्या तपास सुरू आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.
