|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
आज १ मे, ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ – श्रमिकांचा , कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याचा दिवस. हा दिवस कामगारांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या तमाम कामगारांना समर्पित आहे. भारतात या दिवशी वेगवेगळ्या संघटना, संस्था आणि संघटनांनी श्रमिक वर्गाच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
या दिनाचे खरे मार्गदर्शक, कामगारांचा खरा नेता – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच होते. त्यांनी भारतीय कामगार वर्गाच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कायदे तयार केले. आठ तासांचा कामाचा दिवस, कामगार सुरक्षा, वेतन संरक्षण, महिला कामगारांचे अधिकार, बालकामगार प्रतिबंध अशा अनेक सुधारणांची मुळे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीत आहेत.
डॉ. आंबेडकर यांनीच भारतात सर्वप्रथम कामगार कायद्यात मूलभूत सुधारणांचा पाया घातला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानात श्रमिकांच्या हक्कांची पूर्तता करणारे कलमांचा समावेश करण्यात आला.
आजच्या दिवशी त्यांचे स्मरण करून, आपण सर्वांनी ठरवले पाहिजे की प्रत्येक श्रमिकाच्या अधिकारांना आणि योगदानाला आपण योग्य तो सन्मान देऊ.
शौर्य वार्ता परिवाराच्या वतीने सर्व भारतीयांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
