सध्या चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ या चित्रपटाची. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 1 कोटीचा टप्पा जगभरातून पार केल्याचे कळते आहे. परंतु त्यातूनही हे कलेक्शन अधिक असू शकलं असतं, असं अनेकांचेही म्हणणे आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात ज्या मोठ्या संख्येने सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी प्रेम दिलं ते पाहता हा चित्रपट पहिल्या दिवसापासून कोट्यवधींची कमाई करेल असे चित्र स्पष्ट दिसत होते. त्यातून या चित्रपटाच्या ट्रेलरही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

किती आहे आतापर्यंतचे कलेक्शन ?

सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाने पहिल्या व दुसऱ्या दिवशी 24 लाखांचा गल्ला जमावला होता. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 19 लाख तसेच चौथ्या दिवशी या सिनेमाने 14 लाखांची कमाई केली. तर, पाचव्या दिवशी ‘झापुक झुपूक’ने 17 लाख कमावल्याचं वृत्त इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलं आहे. यामुळे, आता ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं वर्ल्ड वाइड एकूण कलेक्शन 1.09 कोटी झाले आहे.

प्रेक्षकांनी फिरवली पाठ ?

यावेळी पाच दिवसात प्रेक्षकांचा सूरजच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद येत असला तरीसुद्धा यावेळी हा आकडा अधिक असू शकला असता. परंतु आता पर्यंत या चित्रपटाने लाखातच कमाई केली आहे. पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी या सिनेमावर निर्मात्यांनी खास ऑफर ठेवली होती. ‘झापुक झुपूक’ सिनेमा प्रेक्षकांना 99 रूपयांमध्ये पाहायला मिळाला होता. आता येत्या काही दिवसांत सूरजचा सिनेमा किती कोटी कमावणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष आहे.

सूरजला काही प्रमाणात ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं आहेत. त्यातूनही अनेकांनी सोशल मीडियावरही टीका केली. यावेळी केदार शिंदे यांनीही लाईव्ह घेत आपले मुद्दे मांडले. ”सूरजच्या ज्या चुका असतील त्या सांगा. तो नट म्हणून आता सुरूवात करतोय. यापुढे त्याला मोठं करिअर आहे. सूरजचे फॅन्स कुठे गेलेत तेच कळत नाहीये. ते ट्रोलर्सना का उत्तर देत नाहीयेत? बिग बॉस करत होतो तेव्हा सूरजची प्रसिद्धी बघितली होती. तळागाळातला माणूस सूरजच्या मागे होता. आज नेमकी तीच माणसं कमी दिसत आहेत.”, असं ते म्हणाले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version