|| प्रतिनिधी : शुभम जाधव ||
पिंपरी चिंचवड : श्री फत्तेचंद जैन विद्यालयास दुहेरी मुकुट
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ला सन 2024 25 चा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन पुणे जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक आणि ( तीन लाखाचे बक्षीस पात्र )
पुणे जिल्हा परिषद व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला.
24 एप्रिल 2025 रोजी गणेश कला क्रीडा रंग म्हणजे येथे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गजानन पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर , तसेच पुणे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री नंदकुमार सागर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी ॲड श्री राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा सहाय्यक सेक्रेटरी अनिलकुमारजी कांकरिया यांनी प्राचार्य सो सुनिता नवले, उप मुख्याध्यापिका सौ मनीषा जैन, पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया, श्री संजीव वाखारे, पर्यवेक्षिका सौ मनिषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी सौ ज्योती छाजेड व सुवर्णा गायकवाड, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
