पुणे : जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घण खुन करुन पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून २४ तासांच्या आत जेरबंद केले

 

अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष वावरे (वय २६, रा. संतोषनगर,कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५, रा. खोपडेनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा़ कात्रज) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास संतोषनगरमध्ये घडली होती.

कात्रज येथील शुभम चव्हाण याच्या घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. शुभम चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांची सहा पथके शोध घेत होते़ पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते मोहोळ तालुक्यातील कामती येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे हे मोहोळ येथे गेले. तेथे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर ते मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावरील समाधान हॉटेल समोर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलिंग दोडमिसे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत मासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, हरीश गायकवाड, अदिनाथ देवकर, प्रकाश विटेकर यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version