|| प्रतिनिधी : किरण आडागळे ||

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पिंपरी चिंचवड काँग्रेसचे निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले सभागृह पिंपरी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते एखाद्या आंदोलन मोर्चामध्ये एवढे काँग्रेसचे पदाधिकारी दिसत नाही अचानक काँग्रेसचे पदाधिकारी दिसल्यामुळे पत्रकार सभागृहा कडे गेले आणि बघितले तर धक्कादायक प्रकार उघड किस आला सभागृहाच्या शौचालय मध्ये जारमध्ये आणि बादली मध्ये पाणी भरतानाचा धकाधक प्रकार उघडकीस आला..!

सदर पाणी कशासाठी भरतात अशी विचारणा केल्यानंतर पाणी भरणाऱ्या संबंधित व्यक्तीने सांगितले की आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीचा कार्यक्रम आहे येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम देखाली आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी भांडी धुण्यासाठी आम्ही पाणी घेऊन जात आहोत असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले. मात्र नक्कीच हे पाणी भांडी धुण्यासाठी घेऊन जात होते का पिण्यासाठी घेऊन जात होते हे त्यांनाच माहीत पण ज्यावेळेस बघितले त्यावेळेस झारमध्ये आणि दोन बकेटमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू होते पत्रकारांनी हा प्रकार बघितले नंतर संबंधित व्यक्तीने सदरचे पाणी फेकून दिले आणि तिथून निघून गेले ह्या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतोय.?

संबंधित केटरिंग चालकावर योग्य कारवाई होणार का अशी देखील चर्चा सुरू आहे

Share.
Leave A Reply

Exit mobile version