मुंब्रा : मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या काही तासांत पोलिसांनी अटक केली. सम्राटनगर परिसरात इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहात असलेल्या असिफ अकबर मन्सूरी (वय 20) याने सोमवारी रात्री याच परिसरात मैत्रीसह खेळत असलेल्या एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवून नराधमाने घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृणपणे हत्या केली.
त्यानंतर याबाबचचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मुलीला खिडकीतून इमारतीच्या डकमध्ये फेकले. व्हेंटिलेशन डकमध्ये काही पडले असल्याचा आवाज झाल्यामुळे इमारतीमधील एका रहिवाशाने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली बघितले असता, त्यांना डकमध्ये अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. त्याने ही बाब इतर रहिवाशांच्या निर्दशनास आणून दिली. रहिवाशांकडून माहिती मिळताच, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह व्हेंटिलेशन डकबाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात लैंगिक अत्याचार, तसेच तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका वीस वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिले. मुंब्रा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब त्या वीस वर्षे तरुणाला काही तासातच त्याच्या घरातून अटक केली. अधिकची चौकशी केल्यानंतर खेळणी देण्याच्या बहाण्याने त्या वीस वर्षे तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला घरी घेऊन गेला व त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले अशी माहिती मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली आहे..
या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा परिसरात खळबळ उडाली, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.खेळणी देण्याचे आमिष दाखवून त्या मुलाने त्या अल्पवयीन मुलीला घरी नेले व त्यानंतर लैंगिक अत्याचार यादरम्यान ती मुलगी आरडाओरडा करू लागली व त्यानंतर त्या वीस वर्षीय तरुणाने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकले अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
