|| प्रतिनिधी : अमोल बेडके ||

पिंपरी चिंचवड : 8 मार्च, जागतिक महिला दिन ! सर्व मातांना, भगिनींना, मैत्रिणींना आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला या विशेष दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा ! ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते. आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते.


जागतिक महिला दिनानिमित्त मर्दानी खेळ असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने मातृ विद्यालय चिंचवड येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळो इंडिया खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मातृ विद्यालय संस्थेचे संचालक मा. स्वामिनाथन सर, व पर्यवेक्षिका
सौ. अस्मिता मॅडम यांनी सर्व खेळाडूंचा सत्कार केला तसेच संघटनेच्या प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय पंच, मा. स्मिता धिवार यांना राजमाता जिजाऊ रणरागिणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .

यावेळी विशेष सन्मान म्हणून श्रीमती सीमा दंडे यांना गौरविण्यात आले, भारत सरकार आयोजित 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत कु. स्नेहल मर्दाने या खेळाडूने कलरीपायट्टू खेळात पिंपरी चिंचवड ची पहिली खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघात स्थान मिळविले व उत्कृष्ट्य कामगिरी केली, त्याबद्दल सन्मानित केले, तसेच दोहा कतार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिलंबम स्पर्धेत पदक विजेते कु. वैदेही नवले, कु. श्रेया दंडे, कु. रिद्धिका पाटील, या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, सदर खेळाडूंना प्रमुख पाहुणे स्वामिनाथन सर, सौ. अस्मिता जोशी मॅडम, तसेच मर्दानी खेळ असोसिएशन चे अध्यक्ष मा. संजय बनसोडे, महासचिव मा. किरण अडागळे यांच्या हस्ते सत्कार झाले, महिला पालकांचा सत्कार करण्यात आले, कार्यक्रमाचे नियोजन

आंतरराष्ट्रीय पदक विजेते प्रशिक्षक मा. केतन नवले सर, तसेच गणेश चखाले, शिवदत्त सिंग, यश बालगुडे, नैतिक उचेचा, निखिल विश्वकर्मा यांनी केले

Share.
Leave A Reply

Exit mobile version