कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला सिमेंटच्या ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात वृद्ध महिला ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गगनबावडा कोल्हापूर मार्गावर निगडेवाडी गावात ही दुर्दैवी घटना घडली. गुरुवारी सकाळी ११. ४९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात मुगाबाई निगडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुगाबाई निगडे या रस्त्याच्या बाजूने जात होत्या. पण त्याचवेळी पाठीमागून काँक्रिट मशीन ट्रक आला आणि मागून निगडे यांना धडक दिली. ट्रकची धडक बसल्यानंतर मुगाबाई निगडे या खाली पडल्या अन् काही कळायच्या आता ट्रकचे समोरील चाक त्यांच्या अंगावर गेलं. त्यानंतरही ट्रक चालकाने ब्रेक मारलं नाही. मागील चाकंही त्यांच्या अंगावरून गेली. या भयानक अपघातात मुगाबाई निगडे यांचा चेंदामेंदा झाला.
घटनास्थळावरच दृश्य पाहून सगळे हादरून गेले होते. स्थानिक नागरिकांनी ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचे काम रखडले असून त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
